व्हॉट्सॲपवरुन ईशनिंदा, पाकिस्‍तानमध्‍ये विद्यार्थ्याला सुनावली फाशीची शिक्षा!

व्हॉट्सॲपवरुन ईशनिंदा, पाकिस्‍तानमध्‍ये विद्यार्थ्याला सुनावली फाशीची शिक्षा!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : व्हॉट्स ॲपवर ईशनिंदा करणारा मेसेजसह फोटो आणि व्‍हिडिओ व्‍हायरल केल्‍याप्रकरणी पाकिस्‍तानमधील पंजाब प्रांतातील न्‍यायालयाने २२ वर्षीय विद्यार्थ्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे वृत्त 'बीबीसी'ने दिले आहे. या प्रकरणी १७ वर्षीय विद्यार्थी अल्‍पवयीन असल्‍याने त्‍याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्‍याचेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

पाकिस्तानमध्ये ईशनिंदेला फाशीची शिक्षा आहे. तथापि, राज्याकडून आतापर्यंत कोणालाही फाशी देण्यात आलेली नव्‍हती. मात्र अशा प्रकारच्‍या कृत्‍याला संतप्त जमावाकडून असंख्य आरोपींना मारण्यात आले आहे. व्हॉट्स ॲपवर ईशनिंदा केल्‍याप्रकरणी लाहोरमधील फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) च्या सायबर क्राईम युनिटने 2022 मध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने आरोप केला आहे की त्यांना तीन वेगवेगळ्या मोबाईल फोन नंबरवरून व्हिडिओ आणि फोटो मिळाले आहेत. चौकशीत विद्यार्थ्याने अश्लील व्‍हिडिओ पाठवले गेले असल्याचे आढळल्‍या दावा 'एफआयए'ने केला होता.

ऑगस्‍ट २०२३ मध्‍ये धार्मिक तेढ निर्माण केल्‍याचा आरोप करत 80 हून अधिक ख्रिश्चन घरे आणि 19 चर्चची तोडफोड करण्यात आली होती.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news