पैठण : नारायणगावात दोन गटात तलवार,काठ्यांनी मारामारी; दोघांना अटक

तलवार,काठ्यांनी मारामारी
तलवार,काठ्यांनी मारामारी

पैठण ; पुढारी वृत्तसेवा पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नारायणगाव येथे (रविवार) रात्री दोन गटात जुन्या वादातून लाठ्या काठ्या तलवारीने हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पैठण विभागाचे डीवायएसपी डॉ. विशाल नेहुल सपोनि भागवत नागरगोजे पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे यांच्यासह पोलीस पथकाने गावात शांतता प्रस्थापित करून दोन संशयीत आरोपींना अटक केली आहे. तसेच या मारहानीतील जखमी लोकांना अधिक उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नारायणगाव येथे जुन्या वादातून रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान नारायणगाव शिवारातील शेती वस्तीवर राहणाऱ्या संतोष गवळी, दशरथ गवळी व आदिनाथ कडुबा गवळी व प्रवीण गवळी यांच्या दोन गटांमध्ये लाट्या, काठ्यांनी व तलवारीने जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीत प्रवीण गवळी, आदिनाथ गवळी रा. नारायणगाव यांच्या डोक्याला व हाताला जबरी मार लागल्यामुळे जखमी झालेल्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पैठण विभागाचे डीवायएसपी डॉ. विशाल नेहुल, सपोनि भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, मेजर सुनील कानडे, अमोल सोनवणे यांच्या पोलीस पथकाने गावात दोन्ही गटाची समजूत घालून शांतता प्रस्थापित केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे हे करीत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news