तेहरान: वृत्तसंस्था : इराणमध्ये तीन महिन्यांपासून हिजाबविरोधात आंदोलन सुरू आहे. यादरम्यान पोलिसांनी ऑस्कर विजेत्या चित्रपटाची अभिनेत्री तारानेह अलीदुस्ती हिला अटक केली आहे. आंदोलनकर्त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर तिने सरकारवर टीका केली होती.
तारानेह अलीदुस्ती ने आठवड्यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तिने हिजाब घातला नव्हता. अलीदुस्तीने मोहिसीन शेखरी नावाच्या तरुणाला दिलेल्या फाशीच्या शिक्षेला विरोध केला होता. या फोटोला १० लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले होते; मात्र आता तिचे इन्स्टा अकाऊंट बंद करण्यात आले आहे. जागतिक संघटना हा रक्तपात पाहत असताना काहीच केले जात नाही, ही मानवतेसाठी लज्जास्पद बाब असल्याचे अलीदुस्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. महिला, जीवन, स्वातंत्र्य याचा वापर इराण सरकार महिलांच्या विरोधात असल्याचेही अलीदुस्तीने पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा :