शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटालाही फटका | पुढारी

शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटालाही फटका

पुढारी ऑनलाईन : शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील गाण्यामुळे मोठा वाद सुरू आहे. २०२३ मध्ये शाहरूखचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी ‘डंकी’ हा देखील एक चित्रपट आहे. शाहरुख ‘डंकी’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.

शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटाचे चित्रीकरण जबलपूर येथील भेडाघाट येथे सुरू आहे. मात्र, ‘पठाण’ चित्रपटाच्या ‘बेशर्म रंग’ या गाण्याचा फटका हा शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटाला बसला आहे. शाहरुख त्याच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी जबलपूरमधील भेडाघाट येथे पोहोचला होता; मात्र यावेळी शाहरुख खान याला लोकांच्याविरोधाला सामोरे जाण्याची वेळ आली. इतकेच नाहीतर लोकांचा रोष इतका जास्त वाढला की, अर्ध्यामध्येच शूटिंग थांबवण्याची वेळ चित्रपट निर्मात्यांवर आली.

हेही वाचा : 

Back to top button