Organ Donation : मुलाच्या लग्नसोहळयात आज वडिल करणार अवयवदानची जनजागृती

Organ Donation : मुलाच्या लग्नसोहळयात आज वडिल करणार अवयवदानची जनजागृती

मुंबई: पुढारी वृत्तसेवा :  आठ वर्षापुर्वी मुलाने वडिलांना यकृत दिले. त्यामुळे त्यांचा पुनर्जन्म झाला. समाजात अवयवदानाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने वडिल मुलाच्या लग्नसोहळयात अवयवदानाची जनजागृती करणार आहेत. त्यांचे नांव बबन जयराम कनवाडे. ते मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत.

परळ गांव येथील बबन कनावजे २०१४ ला यकृतच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना मुलगा विशाल याने स्वतःचे यकृत दिले. हिंदुजा रुग्णालयात बबनकनावजे यांच्यावर प्रत्यारोपण होऊन त्यांना जीवदान मिळाले. त्यावेळी विशाल हा २५ वर्षांचा होता. विशाल याचा लग्नसोहळा उद्या बुधवारी (दि. १८) वडाळा (पश्चिम) येथील भारतीय क्रीडा मैदानावर बुधवारी सांयकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी होणार आहे. या सोहळ्याप्रसंगी अवयवदानाचे महत्व बबन कनावजे यांनी फलकाद्वारे मांडले आहे.

याबाबत बबन कनावजे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. अवयवदाना प्रचार व प्रसार करण्याचामी मानस केला होता. सर्वांनी अवयवदान करावे, असे आवाहन विवाह सोहळ्याप्रसंगी करणार आहे. तसेच माझे यकृत प्रत्यारोपण करणारे डॉक्टर, समुपदेशक व हितचिंतक यांचा मनापासून आभारी आहे. विशालच्या विवाह सोहळ्याला सर्वांनी हजेरी लावून हा आनंद द्विगुणित करावा.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news