कोल्हापूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा सोमवारी (दि.28) दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील. तसेच त्याची प्रिंटआऊटही काढता येणार आहे. राज्य मंडळाच्या वतीने दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. कोल्हापूर विभागातून सुमारे 7 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विभागीय मंडळाकडून सोमवारी www. maharesult. nic. in या संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल जाहीर केला जाणार आहे. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी दि. 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव डी. एस.पोवार यांनी दिली.
हेही वाचा :