फेसबुकवर चक्क मटक्याचे आकडे ! पाचशे रूपयांत लखपती होण्याचे स्वप्न

फेसबुकवर चक्क मटक्याचे आकडे ! पाचशे रूपयांत लखपती होण्याचे स्वप्न
Published on
Updated on

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : फेसबुकवरून मटक्यासाठी आकडे घेणार्‍यांची ऑनलाईन फसवणूक होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. पाचशे रूपयांत लखपती होण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहत असल्याचे, यात बळी पडलेले तरूण सांगत आहेत. फेसबुकवर ऑनलाईन मटक्यासाठी आकडे दाखवून तरूणांना भुलविण्याचे प्रकार होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून आकडे देण्यासाठी 500 रूपये ऑनलाईन द्यावे लागतील, तरच तुम्हाला फिक्स जोडी, जॅकपट, पान्हा दिला जाईल, असे सांगितले जाते. तरूण वर्ग याकडे आकर्षित होत आहे.

संबंधित बातम्या :

किरकोळ पाचशे रूपयांत लखपती होण्याचे स्वप्न पाहत, आमिषाला बळी पडून तरूण वर्ग ऑनलाईन पैसे पाठवितात. परंतु, पाचशे रूपये फेसबुकवरील संबंधित व्यक्तीच्या फोन पे किंवा अन्य खात्यावर पाठविले की, आणखी चॅटसेंड करण्यासाठी 1050 रूपये पाठवावे लागतील, तरच तुम्हाला गेम पाठविला जाईल, असा आदेश ध्वनीमुद्रित करून पाठविला जातो. हे 1050 रूपये पाठविले तरीही आता हॉटस्पाटवर पुन्हा जीएसटीचे आणखी पैसे द्यावे लागतील, असा मेसेज केला जातो. तरूण वर्ग याला बळी पडून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जात आहेत.

पाचशे रूपयात लखपती होण्याच्या स्वप्नापोटी अनेकांना फेसबुक ऑनलाईन आकड्यापायी झटका बसल्याचे नागरिक सांगत आहेत. फोन पे वर पैसे टाकल्याचा स्क्रीनशॉट अगोदर टाकून पैसे मिळण्याची खात्री केली जाते. तरच, पुढील नादी लावण्याच्या प्रक्रिया केली जाते. पैसे जातात, मात्र मटका गेम मिळत नसल्याने फसवणूक होते. नेवासा तालुक्यातील अनेक तरूणांना या फेसबुक ऑनलाईन मटक्याच्या आकड्यांचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. रक्कम टाकून आकडा लावण्यासाठी गेम घेण्याची बला या तरूणांच्या अंगावर चांगलीच बेतत असल्याची चर्चा होत आहे. बोगस पाचशे रुपयांचा मेसेज किंवा जाहिरात यापासून सावध राहण्याचे आवाहन जाणकार लोकांकडून केले जात आहे.

तक्रार करण्याच्या हालचाली
फेसबुकवरून मटक्याचे गेम घेणार्‍यांची संख्या वाढली आहे. अनेकांना झटकाही बसला आहे. पैसे जातात गेम मात्र मिळत नाही. आता फेसबुकवर मटक्याचे गेम देण्याचे आमिष दाखवून पैसे लुटणार्‍या संबंधितांविरुद्ध काही जण तक्रारी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news