आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: १० जणांना अटक, अहेरी पोलिसांची कारवाई

आयपीएलवर ऑनलाईन सट्टा
आयपीएलवर ऑनलाईन सट्टा

गडचिरोली ; पुढारी वृत्‍तसेवा आयपीएलवर ऑनलाईन सट्टा लावण्याच्या अड्ड्यावर अहेरी पोलिसांनी छापा टाकून १० जणांना अटक केली आहे. आरोपींकडून रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. निखील दुर्गे, आसिफ शेख, धनंजय गोगीवार, निखिल गुंडावार, प्रणीत श्रीरामवार, अक्षय गणमुकुलवार, फरमान शेख, फरदीन पठाण, इरफान शेख (सर्व रा.अहेरी) व संदीप गुडपवार रा.आलापल्ली अशी आरोपींची नावे आहेत.

अहेरी येथे आयपीएलवर ऑनलाईन सट्टा चालविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी बालाजी गेस्ट हाऊसवर छापा टाकला. यावेळी तेथे nice.777.fun या अॅपवर ऑनलाईन सट्टा खेळून त्यावर पैसे उधळले जात असल्याचे दिसून आले. घटनास्थळी असलेले निखिल दुर्गे व आसिफ शेख यांच्याकडून चार मोबाईल आणि ९ हजार ४२० रुपये जप्त केले. या दोघांची चौकशी केली असता त्यांनी आम्ही केवळ एजंट आहोत, प्रत्यक्षात इरफान शेखच्या अपर लाईनला संदीप गुंडपवार हा सट्टा चालवित असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय खालच्या पातळीवर निखिल गुंडावार, प्रणीत श्रीरामवार, अक्षय गणमुकुलवार, फरमान शेख आणि फरदीन पठाण हेदेखील एजंट म्हणून काम करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगारबंदी कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे, पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक जनार्दन काळे, गवळी, हवालदार कांबळे, संजय बोलीवार, पठाण, मडावी, शेंडे, केंद्रे, देवेंद्र दुर्गे, सूरज करपे, दहीफळे, भंडे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news