Rohit Pawar On Fadnavis: “तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल”, रोहित पवार फडणवीसांना असे का म्हणाले? | पुढारी

Rohit Pawar On Fadnavis: "तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल", रोहित पवार फडणवीसांना असे का म्हणाले?

पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार सभेदरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर मिश्किल टीका केली आहे. यामध्ये रोहित यांनी “देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली, तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल”, असे म्हटले आहे. (Rohit Pawar On Fadnavis)

 ईश्वराचा आशीर्वाद कुणाला हे ४ जूनला स्पष्ट होईल- रोहित पवार

पुढे रोहित पवार यांनी म्हटले आहे की, आज (दि.२९) ज्याला तुम्ही ईश्वराचा आशीर्वाद म्हणताय ना ते आशीर्वाद नाही तर सत्तेचा गैरवापर करत केलेली कपटी कारस्थानं आहेत. तुम्ही कुणाला येडं बनवता? ईश्वराचा आशीर्वाद कुणाला आहे, हे ४ जूनला स्पष्ट होईल, असे देखील पवार यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून म्हटले आहे. (Rohit Pawar On Fadnavis)

माझ्याशी विश्वासघात…, ईश्वर सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही- फडणवीस

रोहित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे की, मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही, कोणाचे वाईटही चिंतत नाही, कोणाला त्रासही देत नाही. माझ्या आयुष्यात बघा. पण ईश्वराची ही देणगीच आहे, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही. माझा इतिहास तपासा मी कधीच राजकारण केलं नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. (Rohit Pawar On Fadnavis)

Back to top button