अनंतनाग; पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यामध्ये जोरदार चकमक सुरू झाली आहे. या चकमकीला प्रत्युत्तर देताना सुरक्षा रक्षकांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या भागात सध्या दोन्हीकडून अजूनही गोळीबार सुरू आहे.
सुत्राच्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्याच्या पहलगाम परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर अधिकाऱ्याच्या सुचनेनुसार, सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने या भागात शोध मोहीम सुरू केली. याच दरम्यान जंगल परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानावर हल्ला करत गोळीबार सुरू केला. सुरक्षा जवानांनी हल्ल्याला प्रत्यूत्तर देताना एका दशतवाद्याचा खात्मा केला. अजूनही या भागात जोरदार चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांना संपुर्ण बाजून घेराव घालण्याच्या प्रयत्नात आहेत.
काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, अनंतनागच्या पहलगाम भागातील ईस्ट ऑफ बाटकूटमधील श्रीचंद टॉप (वनक्षेत्र) भागात चकमक सुरू आहे. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचलंत का?