पुढारी ऑनलाईन डेस्क : एखाद्याने त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसच्या ( WhatsApp status ) माध्यमातून इतरांशी संवाद साधताना जबाबदारीच्या भावनेने वागले पाहिजे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच नोंदवले आहे.
धार्मिक गटाविरोधात द्वेष पसरवणारा मजकूर पोस्ट केल्याबद्दल दाखल खटला रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका आरोपीने दाखल केली होती. यावर नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी एसए मिनेझिस यांच्या खंडपीठासमोर १२ जुलै रोजी सुनावणी झाली.
यावेळी खंडपीठाने स्पष्ट केले की, आजकाल व्हॉट्सॲप स्टेटसचा उद्देश तुमच्या संपर्कांपर्यंत काहीतरी पोहोचवणे हा आहे. लोक त्यांच्या संपर्कांची व्हॉट्सअॅप स्थिती वारंवार तपासत राहतात. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर स्टेटस अपलोड करताना जबाबदारीने वागले पाहिजे, असे निरीक्षण नोंदवत धार्मिक गटाविरोधात द्वेष पसरवणारा मजकूर पोस्ट केल्याबद्दलचा खटला रद्द होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :