Mumbai | साकीनाका येथे दुकानाला लागलेल्या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

Mumbai | साकीनाका येथे दुकानाला लागलेल्या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

साकीनाका ; पुढारी वृत्‍तसेवा : घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर साकीनाका मेट्रो स्थानकाला लागून असलेल्या राजश्री हार्डवेअर दुकानाला रविवारी (दि.२६) मध्यरात्री दोनच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत ११ कामगार अडकले होते. त्या पैकी नऊ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र यात गुरुदेश उर्फ राकेश गुप्ता (वय २२) आणि गणेश देवाशी (वय२३) या कर्मचाऱ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

आग लागली तेव्हा हे कामगार दुकानात झोपले होते. आग लागल्याचे कळताच दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या ११ कामगारांपैकी सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले. तर दोघे अडकले. यातील राकेशचा मृतदेह तत्काळ मिळाला. तर गणेश गायब होता. पाच तासांनी आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले. कुलिंग प्रक्रिया आणि शोध मोहीम सुरु केली. तेव्हा यात गणेशचा मृतदेह मिळाला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठ्या प्रमाणात वायर आणि प्लास्टीक सारखे ज्वलनशील वस्तू आत असल्याने आग प्रचंड भडकली. दुकानात झोपलेले आठ पैकी सहा कामगार या दरम्यान बाहेर आले तर सकाळी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अद्यापही एका कामगाराचा शोध सुरु आहे. दुमजली असलेल्या या दुकानात कोट्यवधीचे रूपयांचे हार्डवेअरचे साहित्य होते. या आगीत ते पूर्णपणे जळुन खाक झाले. या दुर्घटणेत एकाचा मृत्यू झाला. सध्या हे दुमजली बांधकाम जेसिबीच्या सहाय्याने तोडण्याचे काम सुरु आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news