बीड : जमिनीच्या तुकड्यासाठी पुतण्या जीवावर उठला; चुलता ठार, चुलती गंभीर

file photo
file photo

नेकनूर (बीड) ; पुढारी वृत्‍तसेवा वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील पुतण्याने केलेल्‍या हल्ल्यात चुलता ठार झाल्‍याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच लिंबागणेश जवळील मुळकवाडी येथे शेतीच्या वादातून पुतण्या रोहिदास विठ्ठल निर्मळ (वय 50) याने केलेला हल्ल्यात चुलते बळीराम मसाजी निर्मळ (वय 80) हे ठार झाले. त्यांच्या पत्नी केसरबाई बळीराम निर्मळ (वय 70) यांची प्रकृती गंभीर आहे. संशयीत आरोपीला नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुळकवाडी येथे (शनिवार) सकाळी शेतीच्या वादातून रोहिदास विठ्ठल निर्मळ याने चुलता आणि चुलतीवर राहत्या घरी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. यामध्ये बळीराम निर्मळ आणि त्यांच्या पत्नी केसरबाई निर्मळ गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बळीराम निर्मळ यांचा मृत्यू झाला असून, केसरबाई निर्मळ यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत बळीराम निर्मळ यांची मुले नोकरी निमित्ताने बाहेर आहेत. पती-पत्नीच घरी होते. हा शेतीचा वाद खूप जुना असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी एपीआय शेख, पीएसआय जाधव, पानपाटील लिंबागणेश चौकीचे कॉन्स्टेबल सचिन डिडोळ, मुरूमकर यांनी धाव घेत संशयीत आरोपीला ताब्यात घेतले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news