Covid variant Eris in Maharashtra | धोक्याची घंटा! महाराष्ट्रात सहापैकी एका कुटुंबात कोरोनासदृश्य लक्षणे, नव्या सर्वेक्षणातील माहिती

Covid variant Eris in Maharashtra | धोक्याची घंटा! महाराष्ट्रात सहापैकी एका कुटुंबात कोरोनासदृश्य लक्षणे, नव्या सर्वेक्षणातील माहिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोविडच्या सध्या एक नविन व्हेरिएंट (New Covid Varient) ची भिती निर्माण झाली आहे. एरिस असे या नव्या व्हेरिएंटचे नाव आहे. हा नवा व्हेरिएंट सध्या वेगाने पसरत असल्याची माहिती समोर आली आहे. लोकलसर्कलच्या सर्वेक्षणानुसार कर्नाटकातील तीनपैकी किमान एक कुटुंब, दिल्ली-एनसीआरमधील पाचपैकी एक आणि महाराष्ट्रात सहापैकी एकाला ताप अथवा कोरोनासदृश्य लक्षणे असल्याचे आढळून आले आले आहे. यामध्ये आढळून आलेली सर्व लक्षणे ही कोविडच्या नवीन व्हेरिएंटशी मिळतीजुळती आहेत. (Covid variant Eris in Maharashtra)

एरिस हा ओमिक्रॉननंतरचा चर्चेत आलेला नवा व्हेरिएंट आहे. सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हवामानात फरक झाल्याचे आढळते. यामुळे अनेकजण आजारी पडल्याचे पहायला मिळते. मात्र व्हायरल इन्फेक्शन असेल म्हणून अनेकजण दुर्लक्ष करत असतात. लोकलसर्कल या संस्थेमार्फत एक सर्वेक्षण घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाला दिल्ली-एनसीआर, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील १९,००० हून अधिक रहिवाशांचा प्रतिसाद मिळाला. यामध्ये एकूण ६३ टक्के उत्तरदाते पुरुष होते, तर ३७ टक्के महिला होत्या. यातून कोविडशी संबंधित नवीन व्हेरिएंटशी संबंधित लक्षणे या सर्वेक्षणातून आढळून आली. यामध्ये कर्नाटकातील तीनपैकी किमान एक कुटुंब, दिल्ली-एनसीआरमधील पाचपैकी एक आणि महाराष्ट्रात सहापैकी एका कुटुंबात व्हायरल ताप असल्याचे आढळून आले आहे.

महाराष्ट्रातील कोविड लक्षणे आढळून आलेली टक्केवारी | Percentage of symptoms of covid disease detected in maharashtra

लोकलसर्कलच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील १६% कुटुंबांमध्ये व्हायरल/कोविड-सारखी लक्षणे आढळून आली आहेत. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील रहिवाशांना विचारण्यात आले की, "तुमच्या घरात सध्या किती व्यक्ती आहेत ज्यांना ताप, सर्दी, घसा दुखणे, खोकला, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी, श्वसनासारखी एक किंवा अधिक कोविड/फ्लू/व्हायरल तापाची लक्षणे आहेत?" या प्रश्नाला एकूण ७,६५२ प्रतिसाद मिळाले. यामध्ये ६२ पुरुष होते, तर ३८ टक्के महिला होत्या.

सर्वेक्षणात १२ टक्के व्यक्तींनी माहिती दिली की, त्यांच्या घरातील एक व्यक्ती कोविड/व्हायरल लक्षणांमुळे आजारी आहे, तर ४ टक्के व्यक्तींनी माहिती दिली, की त्यांच्या घरातील दोन-तीन व्यक्ती आजारी आहेत. उर्वरित ८४ टक्के लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरातील कोणीही आजारी नाही. महाराष्ट्रात झालेल्या या सर्वेक्षणानुसार, एकूण १६ टक्के कुटुंबांमध्ये सध्या एक किंवा एक पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये कोविडची लक्षणे आहेत.

नवा व्हेरिएंट एरिसची लक्षणे काय आहेत? What are the symptoms of new variant Eris?

घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक बंद होणे, शिंका येणे, कोरडा खोकला, डोकेदुखी, ओला खोकला, स्नायू दुखणे, ताप तसेच वास न येणे अशी एरिसची लक्षणे आहेत. (Covid variant Eris in Maharashtra)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news