देवळा (जि. नाशिक), पुढारी वृत्तसेवा : देवळा-नाशिक रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात एक युवक जागीच ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना मालेगाव आणि देवळा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
देवळा पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवार दुपारी २ च्या सुमारास देवळा – नाशिक रस्त्यावर अमोल भारत खैरणार (वय ३०), गणेश विजय पगारे (वय ३०), सोमनाथ विजय पगारे ( वय २५ ) हे तिघे रा. मुळाने ता. सटाणा हे मोटरसायकल क्रमांक एम एच ४१ /ए एफ ५९५७ या गाडीने नाशिकच्या दिशेने जात असताना ट्रॅक्टरला ओहरटेक करताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरची धडक झाली. या अपघातात मोटरसायकलस्वार अमोल खैरनार हा युवक जागीच ठार झाला. तर गणेश पगारे, सोमनाथ पगारे हे युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाशिकच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. तर सोमनाथ पगारे किरकोळ जखमी झाला असून त्याला मालेगांवला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तसेच अपघाताबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलचा यात चक्काचूर झाला. आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. देवळा पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून, या अपघाताबाबत गुन्हा दाखल केला आहे. याबाबातचा अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, शासनाने हेल्मेटसक्ती केली असतांना देखील बहुतांश मोटार सायकल स्वार हेल्मेटचा वापर करतात दिसत नाही. या अपघातात ठार झालेल्या युवकाने हेल्मेट घातले नव्हते, कदाचित हेल्मेट असते तर त्याचे प्राण वाचू शकले असते.
हे ही वाचलं का