पुणे : कात्रज दूध संघावर १६ पैकी १५ जागा जिंकत राष्ट्रवादीचे पुन्हा वर्चस्व

कात्रज दूध संघाच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार. डावीकडून अरुण चांभारे (खेड), बाळासाहेब खिलारी (जुन्नर), राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, स्वप्निल ढमढेरे (शिरूर), जि. प.च्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, भाऊ देवाडे (जुन्नर), केशरबाई पवार (शिरूर), लता गोपाळे (खेड).
कात्रज दूध संघाच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार. डावीकडून अरुण चांभारे (खेड), बाळासाहेब खिलारी (जुन्नर), राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, स्वप्निल ढमढेरे (शिरूर), जि. प.च्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, भाऊ देवाडे (जुन्नर), केशरबाई पवार (शिरूर), लता गोपाळे (खेड).
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १६ पैकी १५ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. निकाल घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला.

जिल्हा दूध संघासाठी रविवारी (दि.२०) मतदान झाले आणि सोमवारी (दि. २१) सकाळी कात्रज मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी मतमोजणीस सुरुवात केली. जिल्हा दूध संघातील १६ पैकी ५ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

विजयी उमेदवार कालिदास गोपालघरे (मुळशी), चंद्रकांत भिंगारे (मुळशी)
विजयी उमेदवार कालिदास गोपालघरे (मुळशी), चंद्रकांत भिंगारे (मुळशी)

त्यामध्ये गोपाळराव म्हस्के (हवेली), भगवान पासलकर (वेल्हे), राहुल दिवेकर (दौंड) आणि अनुसूचित जाती-जमाती गटामधून चंद्रकांत भिंगारे हे चार राष्ट्रवादीचे संचालक असून, पुरंदरमधून बिनविरोध निवडून आलेले मारुती जगताप हे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांनासुद्धा सहकार पॅनेलने पुरस्कृत केले होते. तर ११ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात होते. भोरमधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार दिलीप थोपटे वगळता राष्ट्रवादीकडून घोषित सहकार पॅनेलने सर्व जागा जिंकल्या आहेत.

सोमवारी झालेल्या मतमोजणीत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :

  • आंबेगाव : एकूण मतदान ४८. राष्ट्रवादीचे विष्णू हिंगे ३५ (विजयी) शिवसेनेचे अरुण गिरे १२ मते, १ अवैध
  • भोर : एकूण मतदान ७०. अपक्ष दिलीप थोपटे ३८ (विजयी) दीपक भेलके १९, काँग्रेसचे अशोक थोपटे १२, अवैध १.
  • खेड : एकूण मतदान १०६ : राष्ट्रवादीचे अरुण चांभारे ५५ (विजयी) अपक्ष चंद्रशेखर शेटे ५१ .
  • जुन्नर : एकूण मतदान १०९ : राष्ट्रवादीचे बाळासाहेब खिलारी ६१ (विजयी), अपक्ष देवेंद्र खिलारी ४७, अवैध १.
  • मावळ : एकूण मतदान २१ : राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भाजपचे उमेदवार बाळासाहेब नेवाळे १९ (विजयी) लक्ष्मण ठाकर २ – सुनंदा कचरे शून्य मत.
  • मुळशी : एकूण मतदान १५ : राष्ट्रवादीचे कालिदास गोपाळघरे ९ (विजयी) रामचंद्र ठोंबरे शून्य मत.
  • शिरूर : एकूण मतदान १६८ : राष्ट्रवादीचे स्वप्निल ढमढेरे १३० (विजयी) योगेश देशमुख ३६, अवैध २.
  • महिला प्रतिनिधी (2 जागा) ः केशरबाई पवार -शिरूर ५४८ (विजयी), लता गोपाळे – खेड ४३७ (विजयी), रोहिणी थोरात-दौंड ८५, संध्या फापाळे-जुन्नर २०४.
  • इतर मागास प्रवर्ग (1 जागा) राष्ट्रवादीचे भाऊ देवाडे- जुन्नर ४४८ (विजयी), वरूण भुजबळ- जुन्नर १९३, अरुण गिरे – आंबेगाव ३६.
  • भटक्या जाती विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ (1 जागा) : राष्ट्रवादीचे निखिल तांबे – रांजणगांव सांडस-शिरुर ४५० (विजयी), प्रदीप पिंगट – बेल्हे- जुन्नर २३४, अवैध १८.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news