ST Strike azad maidan : मागील ११ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्यातील प्रत्येक स्थानकांमध्ये एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत या आंदोलनाचे मुख्य केंद्र असलेल्या आझाद मैदानावर एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
एसटी परिवहन मंडळाचे अध्यक्ष अनिल परब आणि एसटी संघटनेच्या नेत्यांसोबत बैठक होत आहे. यामध्ये बैठकीमध्ये काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आझाद मैदानावर एसटी कर्मचारी आक्रमक होताना दिसत आहेत. अद्यापही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय होत नसल्याने आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत अनिल परब यांच्या घरी जाणार असल्याचे बोलले जात आहे. मागच्या काही दिवसांमध्ये आंदोलक कर्मचाऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत.
या आंदोलनामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे. महिला कर्मचारी अनिल परब यांच्या घरावर बांगड्या साडी चोळी घेऊन जाणार आहेत. आक्रमक झालेल्या महिला परब यांच्या घरावर मोर्चा घेऊन जाण्यावर ठाम असल्याने आझाद मैदानावर काही काळ वातावरण तणावाचे बनले आहे.
संप मोडून काढण्यासाठी एसटी महामंडळाने आक्रमक पवित्रा घेतला असून, बुधवारपयर्ंत रोजंदारीवरील तब्बल दोन हजार 296 कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटिस पाठविल्या. 24 तासात समाधानकारक उत्तर दिले नाही तर या कर्मचार्यांची सेवा खंडित होऊ शकते. 24 तासांत कामावर हजर व्हा नाही तर सेवा समाप्त करण्यात येईल, असा अल्टीमेटम या नोटिसांमध्ये देण्यात येत आहे.
एसटीतील 93 हजार कर्मचार्यांपैकी 84 हजार 866 कर्मचारी संपात सामील असून 7 हजार 400 कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत.
संपावरील अडीच हजार कर्मचार्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले असले तरी या कारवाईनंतरही कामावर येणार्या कर्मचार्यांची संख्या अत्यल्प आहे.
परिणामी, जेमतेम एसटीच्या 103 बस बुधवारपर्यंत धावल्या आणि दोन हजार 756 वाशांनी प्रवास केला. त्यामुळेच सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटिस बजावणे महामंडळाने सुरू केले आहे.
एसटी महामंडळात संपूर्ण राज्यात दोन हजारपेक्षा जास्त रोजंदारीवरील कर्मचारी असून यात चालक व वाहकही आहेत.