पुढारी ऑनलाईन : ओएलएक्स (OLX) ग्रुपने अनेक क्षेत्रांमध्ये OLX Autos व्यवहार बंद केल्यानंतर आता ८०० कर्मचाऱ्यांना धक्का दिला आहे. OLX ग्रुप ही ऑनलाइन मार्केटप्लेसची मूळ कंपनी आणि Prosus (ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ग्रुप) ची व्यवसाय शाखा यांनी जागतिक स्तरावर ८०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने काही भागांत त्यांचे ऑटोमोटिव्ह व्यवसाय युनिट OLX Autos बंद केले आहेत. त्यानंतर आता कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. (Tech Layoffs)
या वर्षाच्या सुरुवातीला OLX ने त्यांच्या १५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. यामुळे १,५०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार होण्याची वेळ आली. कंपनीतील रिस्ट्रक्चरिंगचा भाग म्हणून ही कर्मचारी कपात करण्यात आली. तसेच खराब आर्थिक परिस्थितीमुळे ही कर्मचारी कपात केली असल्याचे सांगण्यात आले होते.
अॅमस्टरडॅम येथे मुख्यालय असलेली ही कंपनी जगभरातील ३० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. ओएलएक्सच्या प्रवक्त्याने टेकक्रंच या अमेरिकन ऑनलाइन वृत्तपत्राकडे नोकरकपातीच्या निर्णयाची पुष्टी केली आहे. TechCrunch च्या वृत्तानुसार, OLX ने म्हटले आहे की, "या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही OLX Autos व्यवसायातून बाहेर पडण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आणि तेव्हापासून संभाव्य खरेदीदार किंवा गुंतवणूकदारांचा शोध घेण्यात आला."
त्यांनी पुढे म्हटले आहे की "या प्रक्रियेच्या परिणामी हे स्पष्ट झाले की स्थानिक बाजारपेठांचे महत्व लक्षात घेता प्रत्येक देशातील विक्रीकडे लक्ष देणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यात चिली, लॅटिन अमेरिकेतील फायनान्सिग व्यवसाय आणि ओएलएक्स क्लासिफाइड प्लॅटफॉर्म आणि भारत, इंडोनेशिया आणि तुर्कीमधील ऑटो व्यवहार व्यवसायाचा समावेश आहे."
हे ही वाचा :