पुढारी ऑनलाईनल डेस्क: लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत. आता चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. कडक ऊन आणि उष्णतेची लाट असताना मतदानाची टक्केवारी हा निवडणूक आयोगासाठी चिंतेचा विषय आहे. तिसऱ्या टप्प्यात सुमारे ६५ टक्के मतदान झाले. आता केवळ निवडणूक आयोगच नाही तर व्यापारी आणि जिल्हा प्रशासनानेही मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन मोहीमा हाती घेतल्या आहेत. मतदानासाठी लोकांना मोफत पोहे-जलेबी आणि चित्रपटाच्या तिकिटांवर बंपर सवलत दिली जात आहे. तसेच मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करण्यावर भरघोस सवलतींसोबतच अनेक शहरांमध्ये अनेक ऑफर्स Offer For Voting दिल्या जात आहेत. या संदर्भातील वृत्त माध्यमांनी दिले आहे. (Offer's For Voting)
पहिल्या तीन टप्प्यातील मतदानानंतर आता पुढील टप्प्यांसाठी १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, तीन टप्प्यात अपेक्षेप्रमाणे मतदान झाले नाही. पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के, दुसऱ्या टप्प्यात ६६.७१ टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात ६५.६८ टक्के मतदान झाले. विविध राजकीय पक्ष, नेते आणि प्रतिकांनी आवाहन करूनही मतदानाबाबत लोकांची उदासीन वृत्ती पहिल्या तीन टप्प्यात दिसून आली. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासनासह स्थानिक व्यावसायिकांनीही लोकांना मतदानासाठी जागरूक आणि प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक ऑफर्स Offer's For Votingआणल्या आहेत.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सहाव्या टप्प्यातील शनिवार २५ मे रोजी मतदान होणार आहे. लोकांना मतदानासाठी वेळ देण्यासाठी दिल्लीच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने शहरात सशुल्क सुट्टी जाहीर केली आहे. या आदेशानुसार, दिल्लीतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना, मग ते सरकारी असो वा खासगी, त्यांना मतदानासाठी पगारी रजा जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत सोमवार २० मे रोजी लोकसभेच्या अनेक जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या प्रयत्नात मेट्रो प्रशासनाने मतदारांसाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. मतदानाच्या दिवशी मुंबईतील काही मार्गावरील प्रवाशांना 10 टक्के विशेष सवलत देऊ केली आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सोमवार १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करणाऱ्यांना तीन दिवस मोफत प्रवास करण्याचे आश्वासन येथील बसचालकांनी दिले आहे. याशिवाय टी-शर्ट आणि कॅपसाठीही मतदान केंद्रांवर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. इंदूरमधील व्यापारी संघटनांनी मतदारांना शाईचे बोट दाखवल्यावर पोहे आणि जिलेबीचा नाश्ता मोफत देण्याची घोषणा केली आहे.
हरियाणामधील गुरुग्राममध्ये शनिवार २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत गुरुग्राम जिल्हा प्रशासनाने मल्टिप्लेक्सच्या सहकार्याने लोकांसाठी खास ऑफर दिली आहे. मतदारांना चित्रपटाच्या तिकिटे आणि मल्टिप्लेक्समध्ये उपलब्ध असलेल्या स्नॅक्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तुमच्या बोटावर मतदानाची शाई असणे आवश्यक आहे, अशी अट या ऑफरमध्ये घालण्यात आली आहे.
हेही वाचा: