Odisha Train Accident : आईच्या मृतदेहाला बिलगून रडता-रडता अडीच वर्षाच्या चिमुकल्याने दम तोडला; अपघातातील हृदय पिळवटणाऱ्या कहाण्या

Odisha Train Accident : आईच्या मृतदेहाला बिलगून रडता-रडता अडीच वर्षाच्या चिमुकल्याने दम तोडला; अपघातातील हृदय पिळवटणाऱ्या कहाण्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Odisha Train Accident : ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात २८८ लोकांचा मृत्यू झाला. तर शेकडो जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर आरडाओरडा, चेंगराचेंगरी, चोहीकडे मृतदेहांचा पडलेला ढीग, कुणाचे डोके नाही तर कोणाचे हात गेले. तर अपघातात बचावलेले लोक आपल्या आप्तेष्टांना झपाटल्यागत शोधत होते. कोणी आपल्या बहिणीला गमावले. कोणी मुलांना तर कोणी, आपल्या आईला गमावले. तसेच अपघाताच्या बातमीनंतर बालासोर येथे पोहोचलेले आणि आगतिकतेने आपल्या नातेवाईकांचा शोध घेणारे….जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांच्या हृदयाला पिळवटणाऱ्या गोष्टी….

अपघातातील सर्वात जास्त भयानक दृश्य चोहीकडे रक्ताचा थारोळा, विखुरलेले मृतदेह आरडा-ओरडा, अशा परिस्थितीत एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या आईच्या मृतदेहाला बिलगून रडत-रडत आपला प्राण सोडला. या दृश्याने अनेकांचा थरकाप उडाला. Odisha Train Accident

ओडिशातील बालासोरचे रहिवासी रामचंदर मृतदेहांच्या ढिगाऱ्यात आपल्या ८ वर्षांच्या मुलाला शोधत होते. त्यांनी सांगितले की मुलाला घेऊन कोरोमंडल एक्सप्रेसने चेन्नईला निघाले होते. दुर्घटनेनंतर ते रात्रभर शवांच्या ढिगाऱ्यात आपल्या मुलाला शोधत होते. मुलाला शोधता-शोधता त्यांचे डोळे जड पडले होते. त्यांच्या डोळ्यातील वेदना इतरांच्या डोळ्यात पाणी आणत होत्या. ते आपल्या मुलाचे नाव घेत वेड्यासारखे बडबडत होते "कहां है रे…मिल नहीं रहा है" आपल्या ८ वर्षांच्या मुलाचा शोध घेत ते शवाच्या ढिगाऱ्यात वेड्यासारखे फिरत होते.

Odisha Train Accident : "यूं बीच में छोडकर क्यों चला गया"; २६ वर्षीय मुलाचे शव पाहून आने टाहो फोडला

कोरोमंडल एक्सप्रेसने मालदा येथून चेन्नईला निघालेल्या शबाना बेगम यांनी आपल्या २६ वर्षीय मुलाचा मृतदेह पाहिला अन् बेशुद्ध झाल्या. थोडा वेळाने लोकांनी त्यांना पानी पाजून शुद्धीवर आणले. शुद्धीवर आल्यानंतर तिने एकच टाहो फोडला. रडत रडत सांगू लागली. घरी सून दोन छोटे-छोटे नातू आहेत. त्यांना कसे सांभळू.. यूं बीच में छोडकर क्यों चला गया…असे म्हणत तिने पुन्हा टाहो फोडला…
तर थोड्यावेळापूर्वी जे बहीण-भाऊ आनंदात आपल्या कौटुंबिक सुख-दु:खाच्या गप्पा गोष्टी करत होत्या. त्या भावाच्या हातात फक्त आपल्या बहिणीची हँडबॅग उरली होती.

Odisha Train Accident : एकाच कुटुंबातील तिन्ही भावांचा मृत्यू; तिघांचे कुटुंब अनाथ झाले

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील तीन भावांचा ओडिशाच्या बालासोर येथे कामाच्या शोधात तामिळनाडूला जात असताना रेल्वे अपघातात मृत्यू झाला. हरण गायन (40), निशिकांत गायन (35) आणि दिबाकर गायन (32) अशी त्यांची नावे आहेत, ते सर्व चर्निखली गावचे रहिवासी आहेत. तिन्ही भाऊ साधारणपणे वर्षभर तामिळनाडूत राहत असत. तो तिथे छोटे-मोटे मिळेल ते काम करत असे. कुटुंबातील तिन्ही कर्त्या पुरुषांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने तिघा भावांचे कुटुंब अनाथ झाले आहे. संपूर्ण गावावर यामुळे शोककळा पसरली आहे.

अशा अनेक करूण कहाण्या या अपघातात सापडतील. प्रत्येक प्रवासी व त्याचे कुटुंबीय काळजाची चिरफाड करणाऱ्या या अपघाताला कधीही विसरणार नाही.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news