दिल्ली; पुढारी ऑनलाईन : हिंदुचे नुकसान करण्यासाठीच दिल्लीतील दंगल (Delhi Riots) घडवली गेली असे स्पष्ट करत दिल्लीतील न्यायालयाने आरोपी ताहीर हुसेनसह ६ जणांवर आरोप निश्चित केले. यावेळी कोर्टाने स्पष्ट केले की, ताहिर हुसैन याच्या घरी हिंदूंना मारण्याच्या आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने लोक जमले. ताहीर हुसेनसह या लोकांचा हिंदूंना मारणे आणि नुकसान करणे हा एकच उद्देश होता. न्यायालयाने ताहिर हुसैनसह सात जणांवर खुनाच्या प्रयत्नाचे आरोप निश्चित केले.
दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने शनिवारी (दि.५) फेब्रुवारी 2020 च्या दंगलीशी संबंधित एका प्रकरणात आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहिर हुसैन आणि इतर सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट आणि बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे समर्थक आणि त्याला विरोध करणाऱ्यांमध्ये २३ फेब्रुवारी २०२० ते २६ फेब्रुवारी २०२० दरम्यान ईशान्य दिल्लीत जातीय संघर्ष झाला होता. या हिंसाचारात 53 लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले होते. (Delhi Riots)
अधिक वाचा :