NZ vs PAK : पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर किवी घायाळ; फिलिप्सच्या बॅटचे झाले दोन तुकडे (Video)

NZ vs PAK
NZ vs PAK

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या संघाने शुक्रवारी (दि. १४) दमदार कामगिरी केली. पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडने दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद नवाजने २२ चेंडूमध्ये ३८ धावांची कामगिरी केली. मोहम्मद नवाजच्या खेळीच्या बळावर पाकिस्तानला हा विजय मिळवता आला. (NZ vs PAK)

मोहम्मद नवाजने चांगली कामगिरी केली. मात्र, तत्पूर्वी हॅरिस रौफने केलेल्या घातक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडला १६३ धावांपर्यंत रोखण्यात पाकिस्तानला यश आले होते. न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत असताना रौफने घातक गोलंदाजी केली. त्याने पाकिस्तानकडून सहावे षटक टाकले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्सच्या बॅटचे दोन तुकडे झाले. रौफने १४३ ताशीवेगाने चेंडू टाकला होता. चेंडू बॅटच्या खालील बाजूला लागल्याने फिलिप्स बॅटच्या मोठा भाग उडून पडला. हॅरिस रौफने डेवॉन कॉन्वे आणि ईश सोदीला बाद करत महत्वपूर्व विकेट्स पटकावल्या. (NZ vs PAK)

तत्पूर्वी, केन विल्यमसनने केलेल्या ५९ धावांच्या खेळीने न्यूझीलंडला १६३ धावा करता आल्या. १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने सावध सुरुवात केली होती. त्याने केलेल्या संथ कामगिरीमुळे पाकिस्तानचा संघ सामन्यात मागे पडला होता. मात्र, यानंतर मोहम्मद नवाज आणि हैदर अली यांनी ५६ धावांची भागिदारी करत फटकेबाजी केली. नवाज आणि इफ्तिखार अहमदने क्रमश: ३८ आणि २५ धावांची खेळी करून नाबाद राहिले. पाकिस्तान आपल्या टी-२० विश्वचषकाची सुरुवात भारताविरूद्धच्या सामन्याने करणार आहे. २३ ऑक्टोंबरला भारत वि. पाकिस्तान हा सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहे. (NZ vs PAK)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news