NZ vs BAN : बांगलादेशचे न्यूझीलंडला २४६ धावांचे आव्हान

NZ vs BAN : बांगलादेशचे न्यूझीलंडला २४६ धावांचे आव्हान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टॉस हरल्यानंतर न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावत २४५ धावा केल्या. यामध्ये मुशफिकूर रहिमने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. त्याला संघाचा कर्णधार शाकिब अल हसनने (४०) चांगली साथ दिली. अंतिम ओव्हरमध्ये फटकेबाजी करत महदुल्लाहने ४१ धावांचे योगदान दिले. तर न्यूझीलंडकडून गोलंदाजीमध्ये लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. यांच्यासह ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सॅटनर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. वर्ल्डकप स्पर्धेतील तिसरा सामन्यात विजय मिळवण्यासाठी २४६ धावांचे लक्ष्य आहे.

बांगलादेशची फलंदाजी :

लिटन दास भोपळा न फोडता माघारी

बांगलादेशला पहिल्याच बॉलवर धक्का बसला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्याला मॅट हेन्री करवी झेलबाद केले.

बांगलादेशला दुसरा धक्का, ताहिद हसन माघारी

सामन्याच्या आठव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर न्यूझीलंडचा गोलंदाज फर्ग्युसनने ताहिद हसनला कॉन्वे करवी झेलबाद केले. हसनने आपल्या खेळीत १७ बॉलमध्ये १६ धावांची खेळी केली.

बांगलादेशला तिसरा धक्का, मेहदी हसन बाद

सामन्याच्या १२ व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर बांगलादेशला तिसरा धक्का बसला. त्याला न्यूझीलंडचा गोलंदाज फर्ग्युसने मॅट हेन्री करवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत ४६ बॉलमध्ये ३० धावा केल्या.

बांगलादेशला चौथा झटका, शांतो बाद

सामन्यातील १३ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉल विकेट घेत ग्लेन फिलिप्सने बांगलादेशला चौथा धक्का दिला. फिलिप्सने बांगलादेशच्या शांतोला कॉन्वे करवी झेलबाद केले. शांतोने आपल्या खेळीत ८ बॉलमध्ये ७ धावा केल्या.

शाकिब -रहीमने बांगलादेशचा डाव सावरला

अनुभवी मुशफिकुर रहीमसह कर्णधार शकिब अल हसनने बांगलादेशचा डाव सावरला.

बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत, शाकिब अल हसन माघारी

सामन्याच्या ३० व्या ओव्हरमध्ये कर्णधार शाकिब अल हसनच्या रूपात बांगलादेशचा पाचवा फलंदाज बाद झाला. त्याला न्यूझीलंडचा गोलंदाज फर्ग्युसनने लॅथम करवी झेलबाद केले. शाकिबने आपल्या खेळीत ५१ बॉलमध्ये ४० धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ३ चौकार आणि २ षटकार लगावले.

शाकिब पाठोपाठ मुशफिकूर रहिम माघारी

शाकिब बादल्यानंतर मुशफिकुर रहीमही जास्त वेळ मैदानावर राहू शकला नाही. रहिमला मॅट हेन्रीने क्लीन बोल्ड केले. त्याने  ६६ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले.

बांगलादेशला सातवा धक्का, तोहिद हिरदोय बाद

सामन्याच्या ३८ व्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने तोहिदला सॅटनर करवी झेलबाद केले. तोहिदने आपल्या खेळीत २५ बॉलमध्ये १३ धावांची खेळी केली.

बांगलादेशला आठवा धक्का, तस्किन अहमद बाद

सामन्याच्या ४७ व्या ओव्हरमध्ये सॅटनरने बांगलादेशच्या तस्किन अहमदला बाद केले. त्याचा झेल मिचेलने पकडला. तस्किनने आपल्या खेळीत १९ बॉलमध्ये १७ धावा केल्या.

बांगलादेशला नववा झटका, मुस्तफिझूर रहमान बाद

सामन्याच्या ४८ व्या ओव्हरमध्ये मुस्तफिझूर रहमानच्या रूपात बांगलादेशला नववा झटका बसला. त्याला मॅट हेन्रीने लॅथम करवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत १० बॉलमध्ये ४ धावांची खेळी केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news