पुढारी ऑनलाईन डेस्क: हमास संघटनेने इस्रायलवर शनिवारी सात हजार क्षेपणास्त्रे डागल्यानंतर मध्य पूर्वेत युद्ध (Israel-Palestine War) पेटले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) इस्रायलमधील युद्धाक अडकल्याचे समोर आले होते. दरम्यान तिच्याशी कोणताच संपर्क होत नव्हता. मात्र सध्या नवीन आलेल्या अपडेटनुसार, अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्याशी संपर्क झाला असून, लवकरच ती भारतात परतणार असल्याचे सांगितले जात आहे.
अभिनेत्री नुसरत भरुचाची प्रचारक संचिता त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही नुसरतशी संपर्क साधण्यात यशस्वी झालो असून,ती लवकरच मायदेशी परतणार असल्याचे त्यांनी माध्यमांनी सांगितले. (Nushrat Bharucha)
संचिता त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दूतावासाच्या मदतीने तिला सुरक्षितपणे घरी आणले जात आहे. तिला डायरेक्ट फ्लाइट मिळणार नसून, तिला कनेक्टिंग फ्लाईटने भारतात आणले जाणार आहे. तिच्या पुढील सुरक्षेसाठी सध्या अधिक तपशील शेअर करता येणार नाही. पण ती भारतात परतताच आम्ही तुम्हाला कळवू. नुसरतशी संपर्क झाला असून, ती सुरक्षित आहे आणि ती लवकरच भारतात परतणार आहे. याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो, असेही त्यांनी म्हटले आहे. (Nushrat Bharucha)
मीडियासोबत शेअर केलेल्या निवेदनात तिच्या टीममधील एका सदस्याने सांगितले की, 'नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) इस्रायलमध्ये अडकली आहे. हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. त्यांच्या टीमने दिलेल्या मेसेजनुसार शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास नुसरत सोबत शेवटचा संपर्क झाला होता. त्यावेळी ती एका इमारतीच्या तळमजल्यावर सुरक्षित होती. तेव्हापासून तिच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. आम्ही संपर्क करू शकत नसल्याचे तिच्या टीमने सांगितले आहे. आम्ही नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Israel-Palestine War)