पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि पॅलेस्टाइन (Israel-Palestine war) दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने शनिवारी अचानक केलेल्या हल्ल्यात ३०० हून अधिक इस्रायलींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी, इस्रायलकडून केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझा पट्टीमध्ये सुमारे २३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
दरम्यान, अमेरिका आणि भारतासह अनेक देशांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही इस्रायलवरील हल्ले पाहता आठ अब्ज डॉलर्सची आपत्कालीन मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान. आज (दि.८) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी हमासच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलून सर्व मदतीचे आश्वासन दिले आहे. (Israel-Palestine war)
हेही वाचा :