Anurita Jha : Aashram 3 च्या ‘या’ अभिनेत्रीने दिले होते बिनधास्त इंटिमेट सीन

Anurita Jha
Anurita Jha
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या आश्रमच्या दोन्ही सीरीज सुपरहिट झाल्या. आश्रमच्या दोन्ही भागांप्रमाणे तिसरा भागही सुपरहिट ठरला. यामध्ये बोल्ड सीनचा भडिमार पाहायला मिळाला. या वादग्रस्त सीरीजवर धर्मावरून अनेक प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आले होते. असो. 'आश्रम ३′ मध्ये ईशा गुप्ता, त्रिधा चौधरी, अदिति पोहनकर शिवाय यामध्ये अभिनेत्री अनुरिता झाने (Anurita Jha) देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिने या सीरीजमध्ये इंटिमेट सीन दिले होते, ज्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. (Anurita Jha)

अनुरिताने पहिल्यांदा अनुराग कश्यपचा चित्रपट 'गँग्स ऑफ वासेपूर' (२०१२) मध्ये दिसली होती. चित्रपटामध्ये तिने विनीत कुमार सिंहच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर आश्रममध्ये कविता नावाचे पात्र साकारले होते. आश्रमच्या तिसऱ्या भागात तिने जबरदस्त हॉट किसिंग सीन दिले होते.

अनुरिता झा बिहारमधील मधुबनी येथील असून तिने फॅशन मॉडल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. ती गँग्स ऑफ वासेपूरच्या दुसऱ्या भागातही दिसली होती. बॉलीवूडसोबत अनुरिता ओटीटीच्या विश्वात खूप सक्रिय आहे. ती 'परछाई' आणि परिवार यासारख्या वेबसीरीजमध्येही दिसली होती. पण, आश्रममधून तिला खूप लोकप्रियता मिळाली.

मुलाखतीत अनुरिताने आश्रममधील इंटीमेट सीन विषयी सांगितलं होतं की, इंटिमेट सीन करण्यापूर्वी तिने घरी फोन करून आपल्या वडिलांना सांगितले होते. अनुरिता म्हटले होते की, मी पहिल्यांदा इंटीमेट सीन केलं आहे. त्याआधी मी वडिलांना फोन करून सांगितलं होतं. यावर ते म्हणाले होते की, 'हो हो कर, बिनधास्त कर.' म्हणून मला अधिक अडचण झाली नाही. प्रकाश झा यांनीही सेटवर खूप कम्फर्टेबल बनवलं.

अनुरिता म्हणाली, मी बिहारच्या खूप साध्या फॅमिलीतून आहे. त्यामुळे या बोल्ड सीनविषयी मला फार समस्या जाणवली नाही. याविषयी मी प्रकाश झाशी बातचीत केली. त्यांनी मला समजावलं आणि शूटच्या वेळी मोजके लोक ठेवले, ज्यांची खूप गरज होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news