Nuh Violence | नूह हिंसाचार प्रकरणी काँग्रेस आमदार मम्मन खान यांना अटक

Nuh Violence: MLA Mamman Khan
Nuh Violence: MLA Mamman Khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणातील नूह हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचे आमदार मम्मन खान यांना अटक करण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी झालेला हिंसाचार पसरवल्याच्या आरोपाखाली मम्मन खान यांना यांना जयपूरमधून ताब्यात घेतले आहे. हरियाणा पोलिसांच्या विशेष पथकाने काल रात्री उशिरा फिरोजपूर-झिरका येथे ही कारवाई केली. यापूर्वी झिरका मतदारसंघातील काँग्रेस आमदार मम्मन खान यांची सुरक्षा सरकारकडून काढून घेतली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. (Nuh Violence)

संबंधित बातम्या:

मम्मन खान यांच्या अटकेनंतर आज शनिवारी सकाळपासून (१५ सप्टेंबर) उद्या, रविवारी (१६ सप्टेंबर) दुपारपर्यंत हरियाणातील नूह जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. आम्ही नूहमध्ये कलम 144 सीआरपीसी लागू केले आहे. तसेच लोकांना त्यांच्या घरी शुक्रवारची नमाज अदा करण्याची विनंती केली आहे, आमदार मम्मन खान यांचे मूळ गाव भाडस परिसरातही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असेही नूहचे एसपी नरेंद्र बिजार्निया यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. (Nuh Violence)

Nuh Violence: ६० एफआयआर दाखल, ३३० जणांना अटक

नूह हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ६० एफआयआर नोंदवण्यात आले असून, ३३० जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसाचार भडकावल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामधील ५ जणांना अटक करण्यात आली आहे. तपासात काही YouTube आणि टेलिग्राम चॅनल असल्याचे आढळून आले आहे. ज्यांचे सीमेपलीकडून (पाकिस्तान) संबंध आहेत. कोणत्याही अनुचित घटनेत हिंसा भडकवण्याचे ते काम करत आहेत, अशी माहिती नूहचे एसपी नरेंद्र बिजार्निया यांनी दिली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news