Ashish Deshmukh : आता मनोज जरांगेंचे मास्टर माईंड समोर येतील: डॉ. आशिष देशमुख

Ashish Deshmukh : आता मनोज जरांगेंचे मास्टर माईंड समोर येतील: डॉ. आशिष देशमुख

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मुळात निवडणुकीपर्यंत आंदोलन वाढवत न्यायचे, हा मनोज जरांगे यांचा प्रयत्न होता. एसआयटी चौकशीतून मनोज जरांगे यांचे जे कोणी ऑपरेटर किंवा मास्टर माईंड आहेत, ते नक्कीच समोर येतील, असा दावा माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केला. Ashish Deshmukh

राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असताना मनोज जरांगे यांनी सहा महिने आंदोलन सुरूच ठेवले. विशेष अधिवेशनातून मराठा आरक्षण दिले असतानाही स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी जरांगे मराठा आंदोलनाचा वापर करत आहेत, असा आरोप देशमुख यांनी केला. Ashish Deshmukh

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाईट शब्दांत त्यांनी टीका केली. मुळात त्यांना माजी मंत्री राजेश टोपे यांचे पाठबळ आहे. महाविकास आघाडीतील एक पक्ष त्यांच्या मागे उभा असल्यानेच ही हिंमत ते करु शकले, असा आरोप देशमुख यांनी यावेळी केला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news