Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नीविरोधात मानहानीचा दावा दाखल केल्यानंतर घेतला ‘मोठा’ निर्णय

Nawazuddin Siddiqui with aaliya
Nawazuddin Siddiqui with aaliya
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आता आपल्या विभक्त पत्नीसोबत समझोता करण्याच्या तयारीत आहे. नवाजुद्दीनने पत्नी आलियाचे वकील रिजवान सिद्दीकी यांना सेटलमेंट ड्राफ्ट (समझोता मसुदा) पाठवला आहे. या मसुद्यात म्हटले आहे की, अटी चर्चेसाठी खुल्या आहेत. आम्हाला २७ मार्चरोजी होणाऱ्या सुनावणीपूर्वी तुमच्या प्रस्तावित अटी मिळण्याची अपेक्षा आहे.

यावर आलियाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी म्हटले आहे की, नवाजुद्दीनने (Nawazuddin Siddiqui) त्याची पत्नी आलिया आणि त्याच्या भावाविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केल्याच्या एका दिवसानंतर हा मसुदा पाठवला आहे. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रिजवान सिद्दीकीने म्हटले आहे की, दोन्ही बाजूमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी मानहानीचा खटला मागे घेतला पाहिजे. मी आता माझ्या क्लायंटशी यावर चर्चा करणार आहे. मी खात्री देतो की, माझ्या बाजूने तोडगा काढण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. दोघांच्या मधील सर्व वाद कायमचे संपवावेत. आणि पालक म्हणून दोघेही त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करतील आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी कार्यरत राहतील.

दरम्यान, नवाजुद्दीनने त्याचा भाऊ शमसुद्दीन आणि पत्नी अंजना पांडे ऊर्फ ​​आलिया यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालात मानहानीचा दावा दाखल केला आहे.  नुकसान भरपाई म्हणून १०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. नवाजुद्दीनचे वकील सुनील कुमार यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली असून यावर ३० मार्च रोजी सुनावणी होणार आहे. आता

नवाजुद्दीनने  दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, 'माझा भाऊ शमसुद्दीन आणि पहिली पत्नी ​​आलिया दोघे मिळून माझे नाव बदनाम करत आहेत. आलिया आणि मुलांचा मी छळ करत असल्याचे खोटे आरोप केले आहेत. हे सर्व खोटे आहे. याउलट मी त्याच्यासाठी खूप काही केले आहे. यांनतर दोघांनी माझे नाव बदनाम करणाऱ्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करू नयेत. तर दोघांनीही माझी लेखी माफी मागावी' असे नवाजुद्दीने म्हटले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news