Nobel Prize in Physics 2023 | पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉझ आणि ॲने एलहुइलियर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर

Nobel Prize in Physics 2023 | पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉझ आणि ॲने एलहुइलियर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉझ आणि ॲने एलहुइलियर यांना भौतिकशास्त्रातील २०२३ चे नोबेल पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे. "पदार्थातील इलेक्ट्रॉन डायनॅमिक्सच्या अभ्यासासाठी प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद स्पंदन निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतींसाठी" यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल देण्यात येत असल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे. (Nobel Prize in Physics 2023 )

नोबेल पारितोषिक जाहीर होणाऱ्या दुसऱ्या दिवशी आज (दि.३) रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने (The Royal Swedish Academy of Sciences) भौतिकशास्त्रातील नोबेलची घोषणा केली. काल सोमवारी (दि.२) वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज (दि.३) भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. (Nobel Prize in Physics 2023)

यानंतर उद्या बुधवारी, ४ ऑक्टोबर रोजी रसायनशास्त्रातील नोबेल विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे. साहित्यातील नोबेल पारितोषिक ५ ऑक्टोबरला, तर नोबेल शांतता पारितोषिकाची घोषणा ६ ऑक्टोबर रोजी होईल. यानंतर ९ ऑक्टोबर रोजी इकॉनॉमिक सायन्समधील विजेत्यांची घोषणा केली जाईल. (Nobel Prize in Physics 2023)

संबंधित बातम्या

१९१६, १९३१, १९३४, १९४०-४१ आणि १९४२ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले नव्हते. नोबेल फाउंडेशनच्या नियमांनुसार, जर कोणताही शोध निर्धारित निकषांमध्ये बसला नाही, तर परितोषिकाची रक्कम पुढील वर्षापर्यंत राखून ठेवली जाते. पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धात कमी नोबेल पारितोषिके देण्यात आली होती.(Nobel Prize in Physics 2023)

Nobel Prize in Physics 2023: भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांना पहिले नोबेल

पहिल्या दिवशी वैद्यकशास्त्रातील mRNA संबंधित संशोधनासाठी हंगेरीच्या कॅटलिन करिका आणि अमेरिकेच्या ड्र्यू वेसमन या शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. त्यानंतर नोबेल पारितोषिक वितरणातील भौतिकशास्त्रात दिले जाणारे २०२३ मधील दुसरे नोबेल आहे. भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक एक्स-रेडिएशनच्या संशोधनासाठी विल्हेल्म रोंटगेन यांना देण्यात आले होते. तर भारतातील भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांना रमन इफेक्टसाठी पहिले नोबेल पारितोषिक देण्यात आले. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्टॉकहोममधील (स्वीडन) रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसद्वारे प्रदान केले जाते. (Nobel Prize 2023)

Nobel Prize in Physics 2023: चार महिलांना भौतिकशास्त्रातील नोबेल

आत्तापर्यंत केवळ चार महिलांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे. यामध्ये मेरी क्युरी (1903), मारिया गोएपर्ट मेयर (1963), डोना स्ट्रिकलँड (2018) आणि आंद्रिया गेझ (2020) या महिलांचा समावेश आहे. (Nobel Prize in Physics 2023)

कोरोना लस शोधणारे शास्त्रज्ञ कॅटलिन, वेसमन यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल

मेसेंजर आरएनए तंत्रज्ञानाद्वारे कोरोना लस संशोधनात मोलाची कामगिरी बजावून जगाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात योगदान दिलेले शास्त्रज्ञ कॅटलिन कारिको आणि ड्र्यू वेसमन यांना यंदाचे वैद्यकशास्त्राचा नोबेल परिताोषिक जाहीर झाले. एक दशलक्ष डॉलर्सच्या रोख रकमेसह स्मृतिचिन्ह देऊन उभयतांना १० डिसेंबर रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.

ज्यावेळी कोव्हिड-१०९ ने जगाला विळखा घातला होता, त्यावेळी मानवी जीविताला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी या दोन शास्त्रज्ञांनी मेसेंजर आरएनए अर्थात एमआरएनए या तंत्रज्ञानाद्वारे 'कोव्हिड-१०९ प्रतिबंधक लस' शोधून काढण्याची कामगिरी बजावल्यामुळे त्यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा निवड मंडळाने केली आहे. वैद्यकशास्त्रात अनेक दशकांपासून संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांना नोबेल दिले जात होते. यावेळी प्रथमच ही पद्धत मोडून नवसंशोधनासाठी या दोघांना सन्मानित केले आहे. पारंपरिक लसींपेक्षा आरएनए लस अधिक प्रभावशाली आहे. या लसीमुळे थेट जनुकीय रेणुद्वारे प्रतिकारशक्ती मजबूत होऊन विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यास मज्जाव केला होता.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news