घरी आलेल्या घटस्फोटीत नवऱ्याला चहा, नाष्टा देण्याची गरज नाही – मद्रास उच्च न्यायालय No tea snacks to estranged husband

घरी आलेल्या घटस्फोटीत नवऱ्याला चहा, नाष्टा देण्याची गरज नाही – मद्रास उच्च न्यायालय No tea snacks to estranged husband
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – घटस्फोटीत नवरा मुलांना भेटण्यासाठी घरी आला तर त्याला चहा, आणि नाष्टा द्यावा आणि त्याला चहा पिताना सोबत द्यावी, हा निकाल मद्रास उच्च न्यायलयाने रद्दबातल ठरवला आहे. न्यायमूर्ती परेश उपाध्याय आणि डी भरत चक्रवर्ती यांनी हा निकाल दिला आहे. (No tea snacks to estranged husband)

या प्रकरणात न्यायमूर्ती कृष्णा रामास्वामी यांनी १३ जुलै २०२२ला हा निकाल दिला होता. "अनेक घटनांत असे दिसून आले आहे की मुलाला भेटायला आलेल्या जोडीदाराला वाईट वागणूक दिली जाते. त्यामुळे घरी आलेल्या घटस्फोटीत पती किंवा पत्नीला योग्य वागणूक दिली पाहिजे. दोघांत काहीही वाद असले तरी घरी आल्यानंतर पाहुण्यासारखी वागणूक देता आली पाहिजे. आपल्या परंपरेनुसार पाहुण्याला देवासमान मानले आहे."

संबंधित महिलेने या निकालाविरोधात २ न्यायमूर्तींच्या पीठासमोर याचिका दाखल केली. "निकालात दोन्ही बाजूंनी काय मागणी केली आहे, याचा विचार न करता न्यायमूर्तींनी घटस्फोटीत पत्नीची वर्तणूक कशी असली पाहिजे, यावर निकाल दिला आहे," असे या महिलेने याचिकेत म्हटले आहे.

न्यायमूर्ती उपाध्याय आणि डी. भारत चक्रवर्ती यांनी या महिलेची बाजू मान्य केली. "मुलांना भेटण्याचा अधिकार या संदर्भातील ही याचिका आहे. पण या प्रकरणात न्यायमूर्ती भरकटलेले दिसतात, त्यांनी दोन्ही बाजूंची वर्तणूक कशी असली पाहिजे, यावर जे मत व्यक्त केले आहे, ते अनावश्यक आहे."

या महिलेचा घटस्फोट २०१७ला झाला आहे. ही महिला चेन्नईत असते, पण कामानिमित्त ती गुरग्रामला राहण्यासाठी जात आहे. मुलगी सध्या आईसोबत असते. या संदर्भात न्यायमूर्तींनी, "वडील गुरुग्रामला जाऊन मुलीला भेटू शकतात. फक्त त्यांनी पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे," असा निकाल दिला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news