घटस्फोटानंतर ‘ती’ बनली इंग्लंडच्या महाराणीपेक्षाही अधिक श्रीमंत! | पुढारी

घटस्फोटानंतर ‘ती’ बनली इंग्लंडच्या महाराणीपेक्षाही अधिक श्रीमंत!

लंडन : अलीकडच्या काळात बरेच महागडे घटस्फोट चर्चेत आले. जेफ बेजोस, बिल क्लिंटन आदींच्या घटस्फोटांचीही चर्चा झाली. अशा घटस्फोटानंतर पोटगीसाठी पत्नीला देण्यात आलेली संपत्तीही अवाढव्य होती.

आता ‘मिस यूके’ व ‘मिस वर्ल्ड रनरअप’ ठरलेली मॉडेल क्रिस्टी बर्टरेली याच कारणामुळे चर्चेत आली आहे. 50 वर्षांच्या क्रिस्टीने अलीकडेच तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर तिला 35 अब्ज रुपयांपेक्षाही अधिक संपत्ती मिळाली व ती इंग्लंडच्या महाराणीपेक्षाही अधिक श्रीमंत झाली!

क्रिस्टीने घेतलेला हा घटस्फोट साधासुधा नव्हता. यासाठी करण्यात आलेली सेटलमेंट 350 दशलक्ष पौंडांची होती. या सेटलमेंटनंतर ती महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यापेक्षाही अधिक श्रीमंत झाली.

क्रिस्टीने तिचा अब्जाधीश पती अर्नेस्टो याच्यापासून लग्नाच्या 21 वर्षांनी घटस्फोट घेतला आहे. क्रिस्टी केवळ ब्युटी क्वीन नसून ती प्रसिद्ध मॉडेल आणि पॉप सिंगरही आहे. तिच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.

नवर्‍याकडून डिव्होर्स सेटलमेंट स्वरूपात 350 दशलक्ष पौंड मिळाल्यानंतर तिची संपत्ती प्रसिद्ध पॉप गायक एड शिरीन (220 दशलक्ष पौंड), सर मिक जॅगर (310 दशलक्ष पौंड) आणि एडेल (140 दशलक्ष पौंड) यांच्यापेक्षाही अधिक झाली आहे. क्रिस्टी आणि अर्नेस्ट यांनी याच वर्षी जुलैमध्ये आपल्या लग्नाचा विसावा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळेचे छायचित्रही त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

मात्र, अचानक त्यांच्या घटस्फोटाची खबर आल्यावर तिचे चाहतेही हैराण झाले! क्रिस्टी आधीपासूनच स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हाच्या एका शानदार मॅन्शनमध्ये राहत आहे. आता तिची एकूण संपत्ती 400 दशलक्ष पौंड झाली आहे. ब्रिटनच्या महाराणीची संपत्ती 360 दशलक्ष पौंड आहे.

Back to top button