फुमिओ किशिदा : “कोणालाही अधिकार नाही…”, युक्रेन हल्ल्यासंदर्भात जपानची तिखट प्रतिक्रिया

फुमिओ किशिदा : “कोणालाही अधिकार नाही…”, युक्रेन हल्ल्यासंदर्भात जपानची तिखट प्रतिक्रिया
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : "युक्रेनवरील हल्ला खूप गंभीर मुद्दा आहे. तो आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या मूलतत्वांना डळमळीत करत आहे. कोणत्याही ताकदवान व्यक्तीला विद्यमान आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला बदलण्याचा अधिकार दिला जाऊ शकत नाही. जपान युक्रेनला मदत करत राहील", असे महत्वपूर्ण वक्तव्य जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी केलेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा बोलत होते. फुमिओ किशिदा यांनी हे वक्तव्य नरेंद्र मोदी यांच्यासमोरच केले आहे. युक्रेन संकटादरम्यान भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक संबंध मजबूत करण्याची चर्चा दोन्ही पक्षाकडून करण्यात आली आहे.

फुमियो किशिदा म्हणाले की, "भारत आणि जपान निर्माण झालेल्या युक्रेन संकटातून शांतीपूर्ण वाटेने वाटाघाटी व्हाव्यात, अशी इच्छा आहे. हिंदी-प्रशांत महासागर या पट्ट्यात मुक्त आणि स्वतंत्र आवाजदेखील निश्चित केला जाईल." भारताकडून सांगण्यात आले आहे की, "क्वाड हिंदी-प्रशांत महासागर पट्ट्यात शांतता, स्थिरता आणि समृद्धता सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्री करण्यात आले आहे."

क्वाड युतीतील तीन सदस्य जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्यासहीत भारतानेही रशियन सैन्यावर कारवाई करण्याविरोदात आलेल्या तीन प्रस्तावावर मतदान केले नाहीय रशियाने भारताच्या स्वतंत्र आणि संतुलित भूमिकेचे कौतुक केले. जेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये आलेल्या प्रस्ताव दरम्यान नवी दिल्ली गैर हजर राहिली होती.

रशिया हा भारताला मोठ्या प्रमाणात शस्त्रात्रं पुरविणार देश आहे. शितयुद्धादरम्यान भारत आणि रशिया यांच्यामध्ये चांगले नाते तयार झाले होते, ते आजपर्यंत व्यवस्थित आहेत. किशिदा एक उच्चस्थरितीय प्रतिनिधींसोबत भारत दौऱ्यावर आलेले होते. दोन्ही देशांचे १४ शिखर संमेलन होत आहे. हे संमलेन शनिवारी पार पडली. त्यामध्ये जपानने भारतात पुढील ५ वर्षांसाठी ४२ अब्ज डाॅलरची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news