Sunil Gavaskar : टी-20 वर्ल्डकप संघात कुलदीप-युझवेंद्र नको, ‘या’ स्पिनरला घ्या! गावसकरांचे मोठे विधान

Sunil Gavaskar : टी-20 वर्ल्डकप संघात कुलदीप-युझवेंद्र नको, ‘या’ स्पिनरला घ्या! गावसकरांचे मोठे विधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sunil Gavaskar : आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये कुलदीप यादव किंवा युझवेंद्र चहलच्या ऐवजी लेग स्पिनर रवी बिश्नोईची निवड करण्यात यावी. क्षेत्ररक्षणात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यापेक्षा बिश्नोई सरस आहे. तसेच तो फलंदाजीतही योगदान देऊ शकतो, असा विश्वास भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी व्यक्त केला आहे.

या वर्षी जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेगा इव्हेंटसाठी सर्वांच्या नजरा प्रबळ दावेदार असणा-या भारतीय संघावर असतील. या स्पर्धेसाठी संघ निवडताना निवडकर्त्यांना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतील, ज्यामध्ये फिरकीपटूंची निवड सर्वात महत्त्वाची असेल. भारताकडे सध्या रवी बिश्नोई, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल असे अनेक फिरकी गोलंदाजांचे पर्याय आहेत.

दरम्यान, बिश्नोईने अलीकडच्या काळात टी-20 फॉरमॅटमध्ये चांगले यश मिळवले आहे. पण कुलदीप यादवचे ज्यावेळी संघात पुनरागमन झाले त्यानंतर, त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जावे लागले आहे. अशातच गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कुलदीप आणि युझवेंद्र यांच्यापेक्षा बिश्नोईला लेगस्पिनर म्हणून संघात स्थान मिळणे योग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'टी-20 वर्ल्डकपसाठी बिश्नोईला भारतीय संघात स्थान मिळावे असे मला वाटते. तो गोलंदाजीशिवाय तो कुलदीप आणि युझवेंद्र यांच्यापेक्षा चांगला क्षेत्ररक्षक आहे. तो शेवटच्या फळीत फलंदाजी देखील करू शकतो.'

बिश्नोईने टी-20 मध्ये भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने 7 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने 34 बळी घेतले आहेत आणि अलीकडेच आयसीसी टी20 क्रमवारीत पहिले स्थान देखील मिळवले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news