Bihar Politics : बिहारच्‍या ‘राजकारणा’वर ‘जेडीयू’ प्रवक्त्यांचा मोठा दावा, “नितीशकुमार उद्या …”

Bihar Politics : बिहारच्‍या ‘राजकारणा’वर ‘जेडीयू’ प्रवक्त्यांचा मोठा दावा, “नितीशकुमार उद्या …”

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारच्‍या राजकारणाने (Bihar Politics) पुन्‍हा एकदा 'सत्ताकारणा'तील वर्तुळ पूर्ण केले आहे. जनता दल संयुक्‍तचे (जेडीयू) सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार हे राष्‍ट्रीय जनता दल (आरजेडी) साथ सोडत पुन्‍हा एकदा भाजपबरोबर सरकार स्‍थापन करणार असल्‍याच्‍या चर्चेला उधाण आले आहे. याबाबत कोणत्‍याही पक्षाने अधिकृतपणे आपली भूमिका स्‍पष्‍ट केली नव्‍हती. मात्र आता याबाबत बिहारमधील राजकारणावर जनता दल संयुक्‍तचे (जेडीयू) जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते, सरचिटणीस आणि नितीशकुमाराचे राजकीय सल्‍लागार के. सी. त्‍यागी यांनी मोठे विधान केले आहे.

'उमर उजाला'शी बोलताना के. सी. त्‍यांनी म्‍हणाले की, "नितीश कुमार रविवारी ( दि. 28) दुपारी चारच्या सुमारास शपथ घेणार आहेत. जेडीयू आता भाजपकडे वळत आहे. एखादी समस्या गुंतागुंतीची झाली की मी ती सोडवण्याचा प्रयत्न करू लागतो."

Bihar Politics : 'हे राजकारण आहे'

नितीश कुमार यांच्या राजीनामा देणार या शक्‍यतेबाबत काँग्रेस आमदार शकील अहमद खान म्‍हणाले की, नितीश कुमार यांना राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी गेले होते. त्यानंतर विजय चौधरी त्यांना बाहेर भेटायला आले आणि नितीश यांनीही चांगला प्रतिसाद दिला. हे राजकारण आहे. इथे काय म्हणता येईल? जेडीयूचे आमदार बिजेंद्र यादव म्हणाले की, ते पक्षाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यांचा पक्ष जो काही निर्णय घेतो, तो स्वीकारतो.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news