नागपूर : सिलीगुडीतील कार्यक्रमात नितीन गडकरींना आली भोवळ

नितीन गडकरी
नितीन गडकरी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना गुरुवारी (दि.१७) पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे मंचावरच भोवळ आली. यापूर्वी अहमदनगर येथे राज्यपालांच्या उपस्थितीत त्यांना याचप्रकारे भोवळ आली होती.

सिलीगुडी येथील एका रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी गुरुवारी नितीन गडकरी गेले होते. हा भूमीपूजन समारंभ सुरू असतानाच नितीन गडकरी यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी सोबतच्या सहकाऱ्यांना तसे सुचितही केले. डॉक्टरांनी तपासणी केली. गडकरी यांच्या रक्तातील साखरेच्या पॅरामीटरमध्ये अचानक घट झाल्यामुळे त्यांना भोवळ आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आणि त्यांना लगेच मंचावरून हलवून सलाईन लावण्यात आले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेची दखल घेत, पोलीस आयुक्तांना परिस्थितीकडे लक्ष देण्यास सांगितले. गडकरी यांना कार्यक्रमस्थळावरून बाहेर भाजप नेते राजू बिश्त यांच्या निवासस्थानी नेण्यात आले व तेथेच काही काळ त्यांनी विश्रांती घेतली.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news