मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणार्या आ. नितेश राणे यांची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली.
संबंधित बातम्या
महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा दणका दिल्यानंतर राणे यांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने राणे यांना दंडाधिकारी न्यायालयात हजर रहाणे आदेश दिले. त्यानुसार राणे यांनी हजेरी लावली. दंडाधिकारी न्यायालयाने याची दखल घेत जामीन मंजूर केला. त्यामुळे याचिकेत काहीच उरलेले नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
याची न्यायमूर्ती आर, एन. लढ्ढा यांनी दखल घेत याचिका निकाली काढली. नितेश राणे यांना बेताल विधाने केल्याबद्दल संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्याविरोधात अब्रु नुकसानाचा खटला दाखल केला होता.