Coimbatore Blast Case ‘एनआयए’चे तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्‍ये ६० ठिकाणी छापे

Coimbatore Blast Case  ‘एनआयए’चे तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्‍ये ६० ठिकाणी छापे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोईम्बतूर बॉम्‍बस्‍फोट प्रकरणी ( Coimbatore Blast Case ) राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने ( एनआयए ) आज ( दि. १५ ) तीन राज्‍यांमध्‍ये धडक कारवाई केली. तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमधील वेगवेगळ्या ६० ठिकाणी छापे टाकण्‍यात आले आहेत. दहशतवादी संघटना 'इस्‍लामिक स्‍टेस'शी संबंधित संशयितांना अटक करण्‍यासाठी ही धडक कारवाई करण्‍यात आली. तिन्‍ही राज्‍यांमध्‍ये  शोध मोहिम सुरु असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

Coimbatore Blast Case : चार महिन्‍यांपासून 'एनआयए'चा तपास सुरु

ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये दिवाळीच्‍या पूर्वसंध्‍येलाच कोईम्बतूर येथील मंदिराबाहेर कार बॉम्‍बस्‍फोट झाला होता. या आत्‍मघाती हल्‍ल्‍यात जमीशा मुबीन याचा मृत्‍यू झाला होता. कारमधील एलपीजी सिलिंडचा स्‍फोट घडवून मोठा दहशतवादी हल्‍ला घडविण्‍याचा कट होता. मात्र तो फसला आणि २३ ऑक्‍टोबर रोजी पहाटेच कारमध्‍ये स्‍फोट झाला. मुबीनचा कारमध्‍ये संशयास्‍पद परिस्‍थितीत होरपळून मृत्‍यू झाला होता.  घटनास्थळावरून खिळे, संगमरवरी आणि छर्रे सापडले होते. मुबीन हा अभियांत्रिकी पदवीधर होता. २०१९ मध्‍ये दहशतवादी संघटनेबरोबर असलेल्‍या संबंधांतून 'एनआयए'ने त्‍याची चौकशी केली होती. कोईम्बतूर बॉम्‍बस्‍फोटातील मुख्‍य आरोपीमध्‍ये त्‍याचे नाव आहे.

कोईम्बतूर कार बॉम्बस्फोट प्रकरणी आज 'एनआयए'ने तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमधील वेगवेगळ्या ६० ठिकाणी छापे टाकले असून, दहशतवादी संघटना 'इस्‍लामिक स्‍टेस'शी संबंधित संशयितांना अटक करण्‍यासाठी ही कारवाई करण्‍यात आली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news