कोल्हापुरात एनआयएचा छापा, जवाहरनगर येथील एकजण ताब्यात

कोल्हापुरात एनआयएचा छापा, जवाहरनगर येथील एकजण ताब्यात

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरात राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने जवाहरनगर येथील सिरत मोहल्ला, सुभाषनगर परिसरातील एका निवासी संकुलमधील एका संशयिताला गुरुवारी पहाटे छापा टाकून ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयातून ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येते. मात्र अधिकृत माहिती मिळू शकत नाही. संबंधित संशयित हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा येथील पदाधिकारी असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेला मिळाल्याने गुरुवारी पहाटे तीन ते सहा या कालावधीमध्ये पथकातील दहा ते बारा अधिकाऱ्यांनी संशयित राहत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीवर छापा टाकला.

संशयितासह घराची दोन अडीच तासांहून अधिक काळ झडती घेण्यात आली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन हे पथक रवाना झाल्याचे समजते. या घटनेची माहिती जवाहरनगर परिसरात वाऱ्यासारखे पसरतात स्थानिकासह बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींचीही या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. या कारवाईबाबत स्थानिक पोलिस अनभिज्ञ आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news