नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन
महिला अत्याचारासंदर्भात आपल्या सामाजिक संवदेना सजग झालेल्या आहेत. त्याची पुरेशी जनजागृतीदेखील होतात आपल्याला दिसते. स्त्रीवर होणाऱ्या हिंसक अत्याचार संदर्भात वारंवार आवाजही उठवला जात आहे. पण, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS Report) अहवालातून आश्चर्य वाटणारी एक माहिती समोर आली आहे.
ही धक्कादायक माहिती अशी की, १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १४ ते ३० टक्के महिलांनी आपल्या पतीकडून होणाऱ्या मारहाणीचं चक्क समर्थन केलेलं आहे. याच्या उलट पुरुषांनी अशा कृत्याची निंदा केलेली आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या ३ राज्यांतील सर्वात जास्त महिलांनी पतीकडून होणारी मारहाण ही योग्य असल्याचं म्हंटलं आहे.
आकडेवारीचा विचार केला तर मणिपूर ६६ टक्के, केरळ ५२ टक्के, जम्मू-काश्मीर ४९ टक्के, महाराष्ट्र ४४ टक्के, पश्चिम बंगाल ४२ टक्के महिलांनी नवऱ्याकडून होणाऱ्या मारहाणीला योग्यच असल्याचं म्हंटलं आहे. (NFHS Report)
१) बायको विश्वासघातकी असल्याचा संशय पतीला असेल तर…
२) सासरच्या माणसांचा सातत्याने अपमान करत असेल तर…
३) पतीच्या घरातील नातेवाईकांशी सातत्याने वाद घालत असेल तर…
४) लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देत असेल तर…
५) नवऱ्याला कोणतीच कल्पना न देता बाहेर जात असेल तर…
६) घरात जेवण तयार करत नसेल आणि घरातील मुलांचा-बुजुर्गांची काळजी घेत नसेल तर…
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (NFHS Report) असं सांगितलं गेलं आहे की, मुलांची काळजी न घेणं, सासरच्या मंडळीचा आदर न करणं… ही महत्वाची कारणं सांगण्यात आलेली आहेत. ज्या १८ राज्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आला त्याती हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, गुजरात, नागालॅंड, गोवा, बिहार, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या १३ राज्यांतील महिलांनी स्पष्ट सांगितलं आहे की, सासरच्या लोकांचा आदर न करणं, हे प्रमुख कारण नवऱ्याने बायकोला मारण्यापाठीमागचं सांगितलं आहे.
या सर्वेक्षणात हिमाचल प्रदेशमधील महिलांनी नवऱ्याने बायकोला मारणं योग्य नसल्याचे सांगितलेले आहे, तर पुरुषांमध्ये कर्नाटक राज्यांमध्ये ८१.९ टक्के नवऱ्याने बायकोला केलेली मागणी योग्य असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. कोविड काळात घरगुती हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं समोर आलेलं आहे.
पहा व्हिडीओ : पोटासाठी नाचतो मी पर्वा कुणाची? पुरूष लावणी कलावंताची कहाणी
हे वाचलंत का ?