New Zealand Earthquake : न्यूझीलंडमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के

file photo
file photo

पुढारी ऑनलाइन डेस्क : New Zealand Earthquake : न्यूझीलंडकरांची पहाट आज भूकंपाच्या धक्क्यांनी झाली. न्यूझीलंडमध्ये आज बुधवारी (दि. 20) पहाटे 5.6 तीव्रतेचा भूकंप झाला. न्यूझीलंडच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने सांगितले की, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा कोणतीही हानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.

संबंधित बातम्या :

यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, क्राइस्टचर्चच्या पश्चिमेला सुमारे 124 किलोमीटर अंतरावर मध्य दक्षिण बेटावर भूकंप झाला. जिओनेट मॉनिटरिंग एजन्सीने सांगितले की, 14,000 लोकांनी भूकंप जाणवल्याचे सांगितले आहे. तसेच ऑकलंड पर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. एजन्सीने लोकांच्या हवाल्याने सांगितले की, भूकंपामुळे काही ठिकाणी अलार्मही वाजवण्यात आला होता. New Zealand Earthquake

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news