Oil Reserves : कृष्णा-गोदावरी खोर्‍यात सापडले नवे तेलसाठे

Oil Reserves : कृष्णा-गोदावरी खोर्‍यात सापडले नवे तेलसाठे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशातील काकिनाडा किनारपट्टीपासून 30 कि.मी. अंतरावरील कृष्णा-गोदावरी खोर्‍यातील खोल समुद्रात तेलाचे साठे आढळून आले आहेत. केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भातील पोस्ट प्रसारित केली आहे. (Oil Reserves)

7 जानेवारी रोजी बंगालच्या उपसागरात हे साठे सापडल्याचे पुरी यांनी सांगितले. इंधन आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या वतीने (ओएनजीसी) त्यामधून उपसा करण्याचे काम सुरू करण्यात आले. 2016 सालापासून कृष्णा-गोदावरी खोर्‍यातील तेलसाठ्याची शोधमोहीम सुरू होती. परंतु, कोरोना साथीमुळे हे शोधकार्य थांबले होते. नव्या वर्षाच्या प्रारंभीच 7 जानेवारीला या ठिकाणी तेलसाठे आढळून आले आहेत. देशात सध्या 26 तेलसाठे आहेत. त्यापैकी 4 तेलसाठे कार्यान्वित आहेत. (Oil Reserves)

जून-जुलैपासून यामधून दिवसाला 45 हजार बॅरल तेल काढले जाईल. एकूण तेल उत्पादनात याचे प्रमाण 7 टक्के असणार आहे. नैसर्गिक वायू उत्पादनाच्या तुलनेतही हे प्रमाण 7 टक्के राहणार आहे. कृष्णा-गोदावरी खोर्‍यातून तेल उत्पादनाचे दुसर्‍या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आहे. तिसर्‍या टप्प्यातील काम जून 2024 पासून सुरू होणार असल्याची माहिती 'ओएनजीसी'च्या सूत्रांनी दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news