तंत्रज्ञानातील नवा आविष्कार पारदर्शक एलईडी! | पुढारी

तंत्रज्ञानातील नवा आविष्कार पारदर्शक एलईडी!

टोकियो : टी.व्ही.च्या दुनियेत मागील एक-दोन दशकात अगदी व्यापक फेरबदल झाले आहेत. या सर्व वाटचालीत टी.व्ही.चा जणू चेहरामोहराच बदलून गेला आहे. टी.व्ही. आता चांगलाच स्लीम झाला आहे. पण यापुढील जग कसे असेल, याची एका आरपार पाहता येईल, अशा एलईडीच्या माध्यमातून अनुभवास येत असून ही आणखी एक नवी उत्क्रांतीच असणार आहे.

हा नवा एलईडी 77 इंचाचा असेल आणि ट्रान्स्परन्ट कॉन्ट्रॅक्ट लेयर ओएलईडी पॅनेलसह असेल. रिमोटचा वापर करत लेयर हटवला तर हा एलईडी पूर्णपणे पारदर्शक होतो, अशी त्याची रचना आहे. या पारदर्शक एलईडीमुळे युजर्सना अनोखा अनुभव मिळेल, असा संशोधकांचा दावा आहे. हा एलईडी ओएस प्रणालीवर चालतो आणि 11 ए 1 प्रोसेसरने जोडलेला आहे. यामुळे पिक्चर क्वॉलिटीत बराच फरक पडतो. हा सिग्नेचर ओएलईडी आर्ट शोकेसमध्येही बदलता येईल, असा आहे. येत्या वर्षभरात या नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कार उपलब्ध होऊ शकेल, असे सध्याचे संकेत आहेत. ऐंशीच्या दशकात मिस्टर इंडिया या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. त्याची आठवण करून देणार्‍या या एलईडीची उत्सुकता आता लागून राहिली नाही तरच नवल!

Back to top button