पुढारी ऑनलाईन डेस्क : 'ओमिक्रॉन स्पॉन' या नावाने ओळखल्या जाणार्या Omicron प्रकारातील BF.7 चा नवा उप-प्रकार समोर आला आहे. हा नव्याने आलेला व्हेरिअंट चीनमध्ये प्रथम आढळून आला. त्यानंतर आता युनायटेड स्टेट्स, यूके, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम सारख्या इतर देशांमध्ये देखील याचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
एका अहवालानुसार, गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरद्वारे केलेल्या संशोधनामध्ये BF.7 चा पहिला रुग्ण हा भारतात आढळून आला आहे, असे सांगण्यात आले आहे. Omicron चा नवीन उप-प्रकार BA.5.1.7 हा देखील अत्यंत संसर्गजन्य आजार असल्याचे सांगितले जात आहे. हा आजार चीनमधील मंगोलियाच्या प्रदेशामध्ये हा उप-प्रकार अढळून आला आहे.
BF.7 उप-प्रकार प्रथम चीनच्या वायव्य भागात आढळून आला. शानडोंगच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनूसार, 4 ऑक्टोबरपासून सुरू झालेला कोविड-19 चा प्रसार हा BF.7 या प्रकारातील आहे.
BF.7 या संसर्गजन्य आजाराचे गांभीर्य ओळखत जागतिक आरोग्य संघटनेकडून धोक्याची घंटा दर्शविण्यात आली आहे. म्हटले आहे की, हा उप-प्रकार एक नवीन प्रभावी प्रकार बनण्याची शक्यता आहे. "BF.7 विषयी जर योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय वेळेत अवलंबले गेले नाहीत, तर चीनमध्ये हा पुन्हा एकदा नवा आजार अधिक प्रबळ बनण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा