Adipurish : ‘रावणाने इस्लाम धर्म स्वीकारला’, लूकवरून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

saif ali khan
saif ali khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर रविवारी अयोध्येत प्रदर्शित झाला. 'तान्हाजी'च्या यशानंतर दिग्दर्शक ओम राऊतच्या या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. (Adipurish) मात्र, टीझर रिलीज झाल्यानंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या झलकमुळे लोक संतप्त झालेले दिसत आहेत. चित्रपटातील 'रावणाच्या भन्नाट लूक'पासून ते 'बेकार VFX'पर्यंत या टीझरवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. #Adipurish हॅशटॅग ट्विटरवरही खूप ट्रेंड करत आहे. 'आदिपुरुष'च्या या टीझरमुळे नेटकऱ्यांची इतकी निराशा होत आहे की, नेटकऱ्यांनी आदिपुरुषपेक्षा 'ब्रह्मास्त्र' VFX चांगला असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर सैफ अली खानच्या भूमिकेतील रावणाची खिल्ली उडवली जात आहे. (Adipurish)

दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे ५० फूट उंचीचे पोस्टर आणि टीझर अयोध्येत लाँच करण्यात आले. टीझरमध्ये प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत प्रभास, रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आणि सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनॉन दिसत आहेत. पण या टीझरमध्ये रावण असो किंवा हनुमान, त्यांच्या प्रत्येकाच्या लूकमुळे नेटकरी नाराज दिसताहेत. संपूर्ण चित्रपटाचे व्हीएफएक्स पाहिले तर ते खूप बालिश दिसत असल्याचे नेटकरी म्हणताहेत. शिवाय सैफने रावणाची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. त्याचा लूक पाहून प्रत्येक जण कमेंट करत आहे. रावणाचा लूक कमी इस्लामिक लूक अधिक वाटत असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. काहींनी तर रावणाने इस्लाम धर्म स्वीकारला, अशी मिश्किल टीका केलीय.

रावणाच्या लूकवर एका यूजरने लिहिले, 'त्याचे केस कोणी कापले… जावेद हबीब. निर्मात्यांनी रावणाला अलाउद्दीन खिलजीसारखा बनवला आहे." तर एका यूजरने लिहिले की, 'आदिपुरुषांनी प्रेक्षकांना दिलेल्या पेक्षा ब्रह्मास्त्र खूपच छान आहे. ब्रह्मास्त्र पाहिल्यानंतर काही क्षणांत रोमांचित होतो, पण रावण लूक पाहिल्यानंतर केवळ निराशाच येते. आम्हाला प्रभासकडून अशी अपेक्षा नव्हती.

या 'रामायण'वर आधारित हा चित्रपट काल्पनिक कथा म्हणून दाखवण्यात आल्याने एक नेटकरी चांगलाच संतापला आहे. त्याचबरोबर काही नेटकऱ्यांनी 'आदिपुरुष'ची तुलना ८० च्या दशकातील रामायणाशी देखील केली आहे. एका यूजरने लिहिले की, ३० वर्षांनंतरही जुने रामायण अॅनिमेटेड आदिपुरुषापेक्षा सुपर दिसते.

हेदेखील वाचा – 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news