काठमांडू : वृत्तसंस्था : नेपाळमध्ये विमाने मृत्युदूत ठरत आहेत. नेपाळमधील रविवारचा विमान अपघात हा गेल्या 30 वर्षांतील 28 वा विमान अपघात आहे. 1992 ला पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले होते. त्यात सर्व 167 लोकांचा मृत्यू झाला होता. दुर्गम पर्वतीय भूभाग, प्रतिकूल हवामान, जुनी विमाने आणि अननुभवी वैमानिक यामुळे नेपाळ हा विमान उड्डाणासाठी सर्वात धोकादायक देश बनला आहे.
2010 – तारा एअरलाईन्सचे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले. तीन क्रू सदस्यांसह विमानातील सर्व 22 लोक ठार झाले. त्याच वर्षी आणखी एका विमान अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला.
1992 – पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले होते. त्यात सर्व 167 लोकांचा मृत्यू झाला होता.
2011 – बुद्ध एअरचे विमान ललितपूर येथे कोसळले. विमानातील सर्व 22 जणांचा मृत्यू. 10 भारतीयांचा समावेश.
2012 – सीता एअर फ्लाईट 601 क्रॅश होऊन 19 जणांचा मृत्यू. या वर्षाच्या सुरुवातीला आणखी एका विमान अपघातात 15 जणांचा मृत्यू
2016 – पोखरा ते जोमसन विमान उड्डाणानंतर आठ मिनिटांत बेपत्ता. 23 जणांचा मृत्यू. अवशेष नंतर म्याग्दी जिल्ह्यात सापडले.
2018 – त्रिभुवन विमानतळावर उतरत असताना यूएस-बांगला एअरलाईन्सचे विमान कोसळले; 51 जणांचा मृत्यू
2019 – हेलिकॉप्टर टेकडीवर आदळले. नेपाळचे पर्यटन मंत्री रवींद्र अधिकारी आणि उद्योजक आंग त्शिरिंग शेर्पा यांच्यासह 7 जणांचा मृत्यू
हेही वाचा :