RT-PCR : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी निगेटीव्ह आरटी-पीसीआर आवश्यक

RT-PCR : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी निगेटीव्ह आरटी-पीसीआर आवश्यक
RT-PCR : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी निगेटीव्ह आरटी-पीसीआर आवश्यक
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा; RT-PCR : देशातील कोरोनाचे संकट नियंत्रणात आले असले तरी रशियासह इतर काही देशांत हे संकट वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी भारतात येण्यापूर्वी निगेटीव्ह आरटी-पीसीआर अहवाल घेऊन येणे आवश्यक केले आहे. यासंदर्भात सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.

प्रवास करण्याच्या 72 तासांपूर्वी संबंधित प्रवाशाने आरटी-पीसीआर चाचणी करणे व त्याचा अहवाल निगेटीव्ह असणे गरजेचे आहे. प्रवाशांना आरटी-पीसीआर ( RT-PCR ) अहवाल वैध असल्याचे प्रतिज्ञापत्रावर नमूदही करावे लागणार आहे.

देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.१५ टक्क्यांवर!

देशात गेल्या काही दिवसांमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट नोंदवण्यात येत आहे. मंगळवारी दिवसभरात १४ हजार ६२३ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, १९ हजार ४४६ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दरम्यान १६७ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ३ कोटी ४१ लाख ८ हजार ९९६ पर्यंत पोहचली आहे. यातील ३ कोटी ३४ लाख ७८ हजार २४७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. तर,१ लाख ७८ हजार ९८ रूग्णांवर (०.५२%) उपचार सुरू आहे. दुदैवाने आतापर्यंत ४ लाख ५२ हजार ६५१ रूग्णांचा (१.३३%) कोरोनाने बळी घेतला. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.१५ टक्के नोंदवण्यात आला. बुधवारी देशाचा दैनंदिन संसर्गदर १.१० टक्के, तर आठवड्याचा संसर्गदर १.३४ टक्के नोंदवण्यात आला.

कोरोना विरोधात देशभरात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत लसीचे ९९ कोटी १२ लाख ८२ हजार २८३ डोस लावण्यात आले आहेत. यातील ४१ लाख ३६ हजार १४२ डोस मंगळवारी लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १ अब्ज २ कोटी ४८ लाख १२ हजार ५६५ डोस पुरवण्यात आले आहेत. यातील १० कोटी ७८ लाख ७२ हजार ११० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ५९ कोटी ४४ लाख २९ हजार ८९० कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १३ लाख २३ हजार ७०२ तपासण्या मंगळवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

देशातील संपूर्ण लसीकरणाची स्थिती

श्रेणी : संपूर्ण लसीकरण

१) आरोग्य कर्मचारी : ९०,९८,७१५
२) फ्रंटलाईन वर्कर्स : १,५५,८१,७२०
३) १८ ते ४४ वयोगट : ११,५७,२९,७७१
४) ४५ ते ५९ वयोगट : ८,७६,७३,२१७
५) ६० वर्षांहून अधिक : ६,२०,५४,२२९

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news