NDA Delhi Meeting : एनडीएच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत दाखल

NDA Delhi Meeting
NDA Delhi Meeting
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपप्रणित एनडीएच्या (राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या) एकूण ३८ पक्षाच्या प्रमुखांची आज (१८ जुलै) दिल्लीत बैठक होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, दरम्यान विरोधी पक्षांच्या बंगळूरमधील बैठकीवर देखील टीका केली. एएनआय (NDA Delhi Meeting) या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त  दिले आहे.

मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, विरोधक अद्याप आपला नेता ठरवू शकलेले नाहीत. पीएम मोदी यांच्यावर आरोप करणे हा एकमेव विरोधकांचा अजेंडा आहे. पण यामुळे एनडीए आणखी मजबूत होईल अन् २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विक्रम मोडित काढेल; असा विश्वास देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (NDA Delhi Meeting)  यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी आमच्या सरकारला सपोर्ट केला आहे. यामुळे महाराष्ट्रात युतीचे रूपांतर महायुतीत झाले आहे. तसेच एनडीएप्रणीत महायुती आणखी मजबूत झाली आहे, असे मत देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट (NDA Delhi Meeting) केले आहे. एनडीएच्या बैठकीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (अजित पवार गट) 'द अशोका हॉटेल' येथे पोहोचले आहेत.

एनडीएच्या बैठकीपूर्वी भाजपची बैठक

एनडीएच्या बैठकीपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि इतर भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनासंदर्भातील मुद्द्यांसह विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news