Bihar | बिहारमध्ये सत्तेवर येताच NDA सरकार ॲक्शन मोडवर! RJD विरोधात केली ‘ही’ पहिली कारवाई

Bihar | बिहारमध्ये सत्तेवर येताच NDA सरकार ॲक्शन मोडवर! RJD विरोधात केली ‘ही’ पहिली कारवाई
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बिहारमध्ये (Bihar) नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा कोलांटी उडी मारत भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांनी आरजेडी विरोधात पहिली कारवाई केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील अनेक आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष आरजेडी नेते अवध बिहारी चौधरी यांना हटवण्यासाठी विधानसभा सचिवांना अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे.

भाजप नेते नंद किशोर यादव आणि तारकिशोर प्रसाद (माजी उपमुख्यमंत्री); हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी; जेडीयूचे विनय कुमार चौधरी, रत्नेश सदा आणि एनडीए (NDA) आघाडीतील इतर आमदारांनी अवध बिहारी चौधरी यांना पदावरून हटवण्यासाठी नोटीस दिली आहे.

नितीशकुमार यांनी रविवारी महाआघाडी सरकारचे घटक असलेल्या आरजेडी आणि काँग्रेसशी संबंध तोडले आणि विक्रमी नवव्यांदा एनडीए आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यामुळे नितीशकुमार यांच्या सोबत सत्तेत येण्याची भाजपला संधी मिळाली.

या राजकीय घडामोडींमुळे बिहारमध्ये एनडीएकडे १२८ आमदार आहेत. जे बहुमतांपेक्षा ६ अधिक आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी (महागठबंधन) तील आरजेडी, काँग्रेस आणि इतर मिळून ११४ आमदार आहेत.

२४३ जागा असलेल्या बिहार विधानसभेत आरजेडी (RJD) ७९ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष आहे. तर भाजपकडे ७८, जेडीयू ४५ आणि काँग्रेसकडे १९ आमदार आहेत.

डाव्या पक्षांकडे १६ आमदार आहेत. तर हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि एम AIMIM कडे अनुक्रमे ४ आणि १ आमदार आहेत. बिहार विधानसभा सभागृहात १ अपक्ष आमदारही आहे. (Bihar)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news