राष्ट्रवादीकडून वर्धापन दिनानिमित्त टीझर रिलीज (Video)

NCP
NCP

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९ जून राेजी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.  या रौप्य महोत्सवी पदार्पण वर्षाचा कार्यक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी (दि.९) केडगाव ( जि.अहमदनगर ) येथे हाेणार आहे. केडगाव येथे सायंकाळी पाच वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. (NCP)

रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पणानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीझर रिलीज करण्‍यात आला आहे. यामध्ये शरद पवारांच्या भाषणांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. "रौप्य महोत्सवी राष्ट्रवादी विचार भविष्यवादी" असे या व्हिडिओला देण्यात आले आहे. (NCP)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news